क्राईम किस्से : श्रीमंत बापाचा पोरगा समजून अपहरण, घाबरुन हत्या, 20 वर्षांनंतर लागला होता खुनाचा छडा

| Updated on: Nov 10, 2021 | 9:20 AM

1999 मध्ये, पाटणा, बिहार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जुहू पोलिसांकडे एफआयआर दाखल केला, की IIT-B मध्ये शिकत असलेला त्यांचा मुलगा अमित कुमार रामावतार बेपत्ता झाला असून काही जणांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.

क्राईम किस्से : श्रीमंत बापाचा पोरगा समजून अपहरण, घाबरुन हत्या, 20 वर्षांनंतर लागला होता खुनाचा छडा
Amit Ramavtar
Follow us on

मुंबई : 1999 मधील अपहरण आणि हत्या प्रकरणाचा तब्बल 20 वर्षांनंतर मुंबई क्राइम ब्रँचने छडा लावला. 44 वर्षीय मुख्य आरोपी साजिद अब्दुल रशीद आरई (Sajjid Abdul Rashid Arai) हा 1999 पासून फरार होता. संशयिताचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरल्यानंतर दोनदा ही केस बंद करण्यात आली होती. आरोपी साजिद रायगड येथील श्रीवर्धन येथे खोटी ओळख दाखवून राहत होता.

कसा सापडला आरोपी

युनिट 9 या प्रकरणात सावधपणे काम करत होते, त्यांना एक टीप मिळाली की साजिद आरिया त्याच्या मासेमारीच्या व्यवसायासाठी अनेकदा मुंबईला जात असचतो. काही वेळ पाळत ठेवल्यानंतर पोलीस निरीक्षक संजीव गावडे आणि आशा कोरके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने सापळा रचला आणि मोईन अहमद कादरी असे ओळखपत्र दाखवणाऱ्या आरईला अटक केली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपण अराई असल्याचे कबूल केले,” असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

1999 मध्ये, पाटणा, बिहार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जुहू पोलिसांकडे एफआयआर दाखल केला, की IIT-B मध्ये शिकत असलेला त्यांचा मुलगा अमित कुमार रामावतार बेपत्ता झाला असून काही जणांनी 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. घासाघीस केल्यानंतर ही रक्कम कमी करून 5 लाख रुपये करण्यात आली. मात्र वडिलांचं सामाजिक वजन लक्षात असल्याने आरोपी घाबरले. आरई आणि त्याच्या साथीदारांनी अमितला दारु पिण्यास भाग पाडले, त्यानंतर हत्या करुन त्याचा मृतदेह वसईतील खाडीत टाकून पळ काढला.

दोन वेळा केस बंद

अमितचा मृतदेह न सापडल्याने जुहू पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. 2000 मध्ये, त्यांनी प्रकरण बंद केले, त्याचे वर्गीकरण ‘एक सारांश’ (A summary) म्हणून केली. पोलिसांनी न्यायालयात तपशीलवार तपास अहवाल सादर केला, की प्रयत्न करूनही अमित सापडला नाही. मात्र वडील रामावतार यांनी न्यायालयात धाव घेतली. 2007 मध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. 2008 मध्ये गुन्हे शाखेनेही ‘ए समरी’ अहवाल सादर केला आणि तपास बंद केला, असे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले.

गैरसमजातून अपहरण

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरईने सांगितले की, त्यांच्यासोबत शिकणाऱ्या अमितने तो एका बड्या असामीचा मुलगा असल्याचे सांगितले. त्यामुळे तो आणि त्याचा मित्र अब्बास त्याला श्रीमंत समजले आणि पैसे उकळण्यासाठी त्याचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु अराई यांनी सांगितले की, शेवटच्या क्षणी त्यांना भीती वाटली आणि त्यांनी अमितचा गळा दाबून खून केला, त्याचा मृतदेह फेकून दिला आणि पळून गेले. अराई म्हणाला की, मुंबई सोडताना अब्बासचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आरईला 2013 मध्ये रत्नागिरी पोलिसांनी हत्येप्रकरणी अटक केली होती.

संबंधित बातम्या :

स्पा मसाजसाठी विचारणा, उत्तरात मिळाले 150 कॉलगर्ल्सचे दर, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना अनोखा अनुभव

औरंगाबादेत दुसरीतल्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या? मद्यधुंद बापानेच घात केल्याचा संशय