मुंबई : बाईक चोरीचा (Bike Theft) संशय असलेल्या 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईजवळच्या (Mumbai Crime) दहिसर (पूर्व) भागात बुधवारी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज पवार असं मयत तरुणाचं नाव आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून राजने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. 19 फेब्रुवारी राजची बाईक टो केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेस वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पोलिसांनी राजला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.
23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार मुंबई उपनगरात उघडकीस आला आहे. दहिसर पूर्व भागात राहणाऱ्या राज पवार याने बुधवारी आपल्या आयुष्याची अखेर केली. त्याने बाईक चोरल्याचा संशय होता.
पोलिसांच्या त्रासाला कंटाळून राजने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 19 फेब्रुवारी राजची बाईक वाहतूक पोलिसांनी टो केली होती. यावेळी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी राजला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
तासभर कुठल्या मुलीशी बोलतोयस? बायकोने रागात मोबाईल फोडला, नवऱ्याची आत्महत्या
अपघात झाल्याचा खोटा बहाणा, मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या