मुंबई : पुरी भाजी विक्रेत्याने दोघांवर उकळते तेल (Boiling Oil) फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलगी जखमी झाले आहेत. मुंबईतील कुर्ला भागात (Kurla Mumbai) कसाई वाडीत हा प्रकार घडला. पुरी भाजी विकणाऱ्या व्यक्तीचे वृद्धासोबत भांडण झाल्याची माहिती आहे. याच रागातून पुरी भाजी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांवर विक्रेत्याने उकळते तेल फेकल्याचा आरोप आहे. सात वर्षांची चिमुकली आणि वृद्ध व्यक्ती यामध्ये भाजले आहेत. पोलिसांनी गांभीर्याने दखल न घेतल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
पुरी भाजी विक्रेत्याने दोघांवर उकळते तेल फेकले. मुंबईतील कुर्ला भागात कसाई वाडीत हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला. सात वर्षांची मुलगी आणि वृद्ध व्यक्ती यामध्ये भाजले आहेत.
पुरी भाजी विकणाऱ्या व्यक्तीचे वृद्धासोबत भांडण झाले. याच रागातून पुरी भाजी घेण्यासाठी आलेल्या दोघांवर विक्रेत्याने उकळते तेल फेकल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात दोघंही जखमी झाले असून सात वर्षीय लहान मुलीला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चुनाभट्टी पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
दोघांवर उकळते तेल फेकणारा आरोपी पुरी भाजी विक्रेता खुलेआम फिरत असल्याचाही दावा पीडित कुटुंबाने केला. तर, या प्रकरणात कलम 300, 337, 338, 285 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चुनाभट्टीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देसाई यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या :
माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थिनीचं शैक्षणिक नुकसान, दहावीच्या परीक्षेला मुकणार
परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी
ठाण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला, ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याचा संताप