मुंबई : मुंबईतील मानखुर्द पोलीस स्टेशनच्या (Mankhurd) हद्दीत पीएमईजीपी कॉलनी परिसरात रविवारी मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. रामनवमीच्या मिरवणुकीवेळी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Ruckus) झाली. यावेळी बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी 15 ते 20 गाड्यांची तोडफोड (Mumbai Crime) केल्याचं समोर आलं आहे. ही घटना रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. त्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आला. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
मुंबईतील मानखुर्द भागात पीएमईजीपी म्हाडा कॉलनी येथे काही अज्ञात व्यक्ती बाईकवर स्वार होऊन आले. त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या घटनेबाबत मानखुर्द पोलीस अधिक तपास करत आहेत.
गाड्यांची तोडफोड करणारे लोक कोण होते, कुठून आले, याबाबत पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस लोकांची चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मानखुर्द पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. दोन लोकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
भाच्याचं भांडण मामाच्या जीवावर, चुना मागितल्याने दोन गटात राडा, हाणामारीत मामाचा मृत्यू
VIDEO | कल्याणच्या सिग्नलवर दोघा तरुणांमध्ये राडा, कार चालकाने दुसऱ्याला फरफटत नेलं