मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) अटक असलेला आरोपी आणि निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) याने विशेष एनआयए कोर्टात धाव घेतली आहे. कुटुंबीयांना भेटण्याच्या परवानगीसह काही मागण्यांसाठी वाझेने अर्ज केला.
काय आहेत मागण्या?
खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी सचिन वाझेने मागितली. त्याचबरोबर घरच्या सदस्यांना भेटण्याची आणि घरचे जेवण मिळण्याबाबतही वाझेने परवानगी मागितली. सचिन वाझेच्या वकिलांनी एनआयए कोर्टात यासंबंधी अर्ज केला.
कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली
दरम्यान, एनआयएचे विशेष न्यायाधीश प्रशांत शिंत्रे यांनी वाझेची कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. मात्र इतर दोन अर्ज म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासंदर्भात 27 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सचिन वाझेला तीन हार्ट ब्लॉकेजेस असून बायपास सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सचिन वाझे वेळोवेळी एनआईय मार्फत जेजे रुग्णाल्यात उपचार घेत आहे.
सचिन वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे.
पाच आरोपींबाबत चार्जशीट सादर करणार
सचिन वाझेसोबत रियाजुद्दीन काझी, सुनील माने, विनायक शिंदे आणि बुकी नरेश गौर न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या पाच आरोपींच्या संदर्भात चार्जशीट सादर करणार असल्याची एनआयएकडून विशेष कोर्टात माहिती देण्यात आली.
संबंधित बातम्या :
ना NIA कोर्ट, ना ED, सचिन वाझे ते खडसेंचा जावई, अद्याप कोणालाच जामीन नाही
वसुलीचे पैसे घेणारा नंबर एक कोण? सचिन वाझेने नाव फोडलं, ED चा दावा!