मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयातील इमारतीत चिमुरड्या मुलीसोबत अतिप्रसंग झाल्याचा आरोप केला जात आहे. आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर सहा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याची माहिती आहे. रुग्णालय परिसरात कचरा वेचणाऱ्या 24 वर्षीय तरुणानेच अतिप्रसंग केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
काय आहे प्रकरण?
सुरज गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. सायन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने मुलीला तुझी आई बोलवत आहे, असे सांगून बोलवून घेतले. चॉकलेटचे आमिष दाखवून पीडित मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
24 वर्षीय तरुणावर गुन्हा
रविवारी सायंकाळी सायन रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या इमारतीच्या टेरेसवर हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात आरोपी सुरज गायकवाड विरोधात भादंवि कलम 354 सह 8, 12 पोस्को 2012 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुण्यात जावा-जावांची परस्परांच्या पतीवर तक्रार
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बलात्काराचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या विचित्र घटनेमध्ये राजगड पोलिसांनी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नात्याने एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.
संबंधित बातम्या :
चुलत जावांची एकमेकींच्या पतीविरोधात बलात्काराची फिर्याद, एकीवर गोठ्यात, दुसरीवर लॉजमध्ये अत्याचार