VIDEO | लाकडी दांडके-लोखंडी रॉड, नालासोपाऱ्यात दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 18, 2021 | 3:07 PM

नालासोपारा पूर्व भागातील पांडे नगर, जय अंबे चाळीसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. लाकडी दांडे, लोखंडी रॉडसह लाथा बुक्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका पोलिसाचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

VIDEO | लाकडी दांडके-लोखंडी रॉड, नालासोपाऱ्यात दोन गट भिडले, तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल
नालासोपाऱ्यात दोन गटात तुंबळ हाणामारी
Follow us on

नालासोपारा : दोन गटांमध्ये लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी हाणामारी झाल्याची घटना मुंबईजवळच्या नालासोपारा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्व भागातील पांडे नगर, जय अंबे चाळीसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. लाकडी दांडे, लोखंडी रॉडसह लाथा बुक्क्याने एकमेकांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एका पोलिसाचाही समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

दोन्ही गटातील 7 जणांना अटक

पूर्ववैमनस्यातून ही हाणामारी झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबत परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील व्यक्तींवर तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटातील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या हाणामारीत 4 ते 5 जण किरकोळ जखमीही झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दाखल घेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी घटनास्थळावर पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे.

पाहा व्हिडीओ :

वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी

दुसरीकडे, वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पश्चिम अंबाडी रोडवरील भाजी मार्केटसमोरील मध्यरात्री सव्वाबारा वाजताची ही दृश्यं आहेत.

भर रस्त्यावर दोन गटांमध्ये ठोसा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मात्र ही मारामारी करणारे कोण आहेत, नेमकी का मारामारी करत आहेत, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मात्र हाकेच्या अंतरावर माणिकपूर पोलीस ठाणे असतानाही मारामारी करणाऱ्यांची एवढी हिंमत वाढल्याने वसईत कायदा सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्तालय स्थापन, मात्र गस्तीवर पोलीस नाही

वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्हेगारी रोखण्यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन सव्वा वर्ष उलटले आहे. तरीही एकही पोलीस कर्मचारी रात्रीचा गस्तीवर नाही. त्यामुळेच वसई विरारची सुरक्षा सध्या रामभरोसेच चालू आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ

VIDEO | वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी, मध्यरात्री सव्वाबारा वाजता भररस्त्यात ढिशूम-ढिशूम