नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फळ मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास संपत कराळे या व्यापाऱ्याने गळफास घेतला. व्यापाऱ्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये N विंग गाळा नंबर 914 मध्ये व्यापाऱ्याने गळफास लावला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाली असून व्यापाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी वाशी मनपा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. व्यापाऱ्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मार्केटमध्येच फळ व्यापाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
संपत कराळे (वय 62 वर्ष) हे फळ मार्केटमध्ये हंगामी फळांचा ओपन शेडमध्ये व्यापार करत होते. N विंग गाळा नंबर 914 मध्ये ते राहत होते. काही व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ते हसमुख आणि स्वभावाने चांगले होते. त्यांचे कोणाशीही भांडण नव्हते.
अत्यंत शिस्तप्रिय असलेल्या कराळे कर्जबाजारी झाले होते. घरात काही वादविवाद झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे, अशी चर्चा बाजार आवारात रंगली आहे. एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
बीएच्या विद्यार्थिनीची हत्या, मृतदेह नाल्याजवळच्या झुडपात, आजोबांच्या मित्रानेच जीव घेतल्याचा संशय
पोलीस, हत्या आणि खलबत्ता, मुलीच्या नांदण्यावरुन कल्याणमध्ये जे घडलं त्यावर पोलीस दल हादरलं
रात्री नवरा अचानक घरी, पत्नी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, एकही शब्द न बोलता नवऱ्याने…