खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठेवलेली कुंडी चोरीला, डोंबिवलीतील त्याच खड्ड्यात अडकून बाईकला अपघात

| Updated on: Sep 14, 2021 | 11:38 AM

वाहनचालकांना दुरुनच कुंडी दिसेल आणि ते खड्ड्यातून जाण्याचे टाळतील हा त्यामागचा उद्देश असल्याचे महेश सांगतात. मात्र ही कुंडीही एक रिक्षाचालक घेऊन पसार झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

खड्ड्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठेवलेली कुंडी चोरीला, डोंबिवलीतील त्याच खड्ड्यात अडकून बाईकला अपघात
खड्ड्यात कुंडी, कुंडीची चोरी आणि त्याच खड्ड्यात अपघात
Follow us on

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांमध्ये इतके खड्डे झालेत, की रस्त्यात खड्डा आहे, की खड्ड्यात रस्ता – हेच कळत नाही. विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांचा अपघात होऊ नये, यासाठी एका दक्ष नागरिकाने झाडाची कुंडी खड्ड्यात आणून ठेवली. पण ती कुंडीदेखील एका रिक्षाचालकाने चोरुन नेली. दुर्दैव म्हणजे खड्ड्याकडे लांबून लक्ष वेधण्यासाठी ठेवलेली ती कुंडी चोरीला जाऊन काही तास उलटत नाहीत, तोच एका दुचाकीस्वाराला तिथे अपघात झाला. खड्ड्यात अडकून पडल्यामुळे दुचाकीस्वाराला दुखापत झाल्याची माहिती आहे.

डोंबिवलीत खड्डेच खड्डे

डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कलवरून कल्याण दिशेला जाणाऱ्या न्यू कल्याण रोड या रस्त्यावर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. 90 फीट रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या पुढील बाजूला ‘द फूड व्हिलेज’ हॉटेलच्या समोरील मोठा खड्डाही प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. अनेक वाहन चालक या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यात आदळत आहेत.

जागरुक नागरिकाचा आटापिटा

वाहन चालकांचे अपघात रोखण्यासाठी जागरुक नागरिक महेश चव्हाण यांनी सुरुवातीला त्या खड्ड्यात खडी आणून टाकली. मात्र पावसामुळे खडी वाहून गेली. वाहन चालकांना हा खड्डा दिसावा म्हणून नंतर त्यांनी त्या ठिकाणी टायरची ट्यूब ठेवली. पण ती ट्यूबही कोणी तरी चोरून नेली. शनिवारी त्यांनी त्या खड्ड्यात रोपट्याची कुंडी ठेवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

खड्ड्यातील कुंडीचीही चोरी

वाहनचालकांना दुरुनच कुंडी दिसेल आणि ते खड्ड्यातून जाण्याचे टाळतील हा त्यामागचा उद्देश असल्याचे महेश सांगतात. मात्र ही कुंडीही एक रिक्षाचालक घेऊन पसार झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती.

कुंडी चोरीचा व्हिडीओ बघा :

कुंडी चोरीनंतर 24 तासात अपघात

याला 24 तास उलटत नाहीत, तोवर या खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघात झाला आणि तो जखमी झाला. खड्ड्यात अडकून पडल्यामुळे दुचाकीस्वाराला दुखापत झाल्याची माहिती आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. त्यामुळे झोपी गेलेले प्रशासन जागे होईल का हे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या :

VIDEO : काय करावं नेमकं? केडीएमसी एकीकडे खड्डे भरत नाही, अपघात टाळण्यासाठी लावण्यात आलेली झाडाची कुंडी चोरटे सोडत नाही

आईच्या भेटीसाठी गेला, रात्री मुक्कामाला थांबला, पण घरातच डोकं ठेचून हत्या, हत्येमागचं गूढ नेमकं काय?

साकीनाका बलात्कार प्रकरणी अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, 20 लाखाची मदत, वकील राजा ठाकरे यांची नेमणूक, मुंबई पोलीस आयुक्तांकडून 3 महत्त्वाच्या अपडेट