मुंब्य्रातील बिल्डरकडून 6 कोटींची खंडणी, तिघा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा, तपास NIA कडे

| Updated on: May 11, 2022 | 10:41 AM

एका बिल्डरकडून 6 कोटी रुपये लुटल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीताराम शेवाळे, हर्षद काळे आणि मदने अशी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तिघा अधिकाऱ्यांची नावं आहेत.

मुंब्य्रातील बिल्डरकडून 6 कोटींची खंडणी, तिघा पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा, तपास NIA कडे
बिल्डरची लूट, पोलिसांवर गुन्हा
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

ठाणे : ठाणे मुंब्रा पोलीस ठाण्यातील (Mumbra Police) 3 अधिकार्‍यांविरुद्ध एका बिल्डरचे 6 कोटी रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा येथील संबंधित तिघा पोलीस अधिकाऱ्यांनी आधी अन्य तीन खासगी लोकांसह मुंब्रा येथील बिल्डर आणि खेळणी व्यापारी फैजल मेनन (Faijal Menon) यांच्या घरावर छापा टाकला. त्याच्या घरातून 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. त्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी बिल्डरकडून बळजबरीने सहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप (Ransom) आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे शहर पोलिसांच्या उच्चपदस्थांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचा दावा केला आहे, तर आरोपी पोलिसांची वैद्यकीय सुट्टीवर (मेडिकल लीव्ह) गेले आहेत. आता या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करणार आहे.

काय आहे प्रकरण?

एका बिल्डरकडून 6 कोटी रुपये लुटल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीताराम शेवाळे, हर्षद काळे आणि मदने अशी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तिघा अधिकाऱ्यांची नावं आहेत. गीताराम शेवाळे हे मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हे पोलिस निरीक्षक आहेत.

नेमकं काय घडलं?

12 एप्रिल रोजी मुंब्रा येथील बिल्डर आणि खेळणी व्यापारी फैजल मेनन यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या आधारे त्यांनी मेनन यांच्या घरावर छापा टाकून 30 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर या लोकांनी जप्त केलेला काळा पैसा मुंब्रा पोलीस ठाण्यात आणला.

हे सुद्धा वाचा

6 कोटी रुपये रोख घेतल्याचा आरोप

हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांकडून खंडणीची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. हे संपूर्ण प्रकरण दोन कोटींवर मिटले. पोलीस अधिकाऱ्यांनी 6 कोटी रुपये रोख घेतले. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर इब्राहिम शेख नावाच्या तरुणाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली, ज्याचा तपास ठाणे शहर पोलिसांचे सहायक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक हर्षद काळे यांनी मुंब्रा येथील आठ एमडी ड्रग्ज विक्रेत्यांना पकडल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत धिंड काढली होती.