उल्हासनगर : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना दहा दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Car Accident) घडली होती. या प्रकरणी गाडी चालवणाऱ्या प्राध्यापिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्राध्यापिकेला कोर्टाने जमीन मंजूर केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरातील पवई चौक भागात शनिवार 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली होती. या भागातून विलास सनके हे पादचारी जात असताना त्यांना एका चारचाकी गाडीने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या सनके यांचा दुसऱ्या दिवशी उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
ही गाडी आरकेटी कॉलेजच्या प्राध्यापिका गीता मेनन चालवत होत्या. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विलास सनके यांना उचलून बाजूला नेताना आणि स्थानिक तरुणांनी मदत करतानाची दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली होती. या घटनेला 5 दिवस उलटूनही सनके यांच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार दाखल केली नव्हती. इतकंच नव्हे तर आमची काहीही तक्रार नसल्याचं त्यांनी पोलिसांना लिहून दिलं होतं.
दुसरीकडे, मयत विलास सनके यांनीही माझी काहीही तक्रार नसल्याचं स्टेटमेंट पोलिसांना मृत्यूपूर्वी दिलं होतं. मात्र या सगळ्यात पोलिसांनी 24 डिसेंबर रोजी सुमोटोने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून प्राध्यापिका गीता मेनन या पोलिसांसमोर आल्या नव्हत्या. अखेर आज उल्हासनगर न्यायालयात त्यांनी शरणागती पत्करली. यावेळी न्यायालयाने त्यांची लगेचच जामिनावर मुक्तता केली.
संबंधित बातम्या :
उत्तर प्रदेशात नात्याला काळीमा, काकाने युवतीचे अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू
अंबरनाथमध्ये माजी नेव्ही ऑफिसरला मारहाण; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, तर मुख्य आरोपी फरार