विरार : विरारमध्ये इमारतीतून फेकलेल्या नवजात बाळाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने हत्येची कबुली दिली आहे. अल्पवयीन प्रेमी युगुलाच्या शारीरिक संबंधांतून मुलीचा जन्म झाला होता. त्यानंतर अल्पवयीन कुमारी मातेनेच आपल्या पोटच्या बाळाची इमारतीतून खाली फेकून हत्या केल्याचे समोर आले आहे.
मुंबईजवळच्या विरार पश्चिम येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन फेकलेल्या स्त्री जातीच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन मातेनेच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी केली. 16 वर्षांच्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने कृत्याची कबुली दिली.
नेमकं काय घडलं?
16 वर्षांची मुलगी आणि 17 वर्षांचा मुलगा यांच्या शारीरिक सबंधातून बाळाचा जन्म झाला होता. सैल कपडे घालून तिने आपल्या कुटुंबीयांपासून प्रेग्नन्सी लपवली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तिने बाथरुममध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतीने दुसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतूनच तिने बाळाला खाली फेकलं होतं.
बाथरुमच्या ग्रीलवरील रक्ताचे डाग
मंगळवारी दुपारी इमारतीजवळ नवजात स्त्री जातीचे बाळ सापडले होते. स्थानिकांनी हे बाळ दिसल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली होती. मात्र उपचारा दरम्यान बाळाचा मृत्यू झाला होता. इमारतीत तीन महिला गरोदर असल्याचं पोलिसांना समजलं. मात्र अल्पवयीन मुलीच्या बाथरुमच्या ग्रीलवरील रक्ताच्या डागावरुन नवजात बाळाच्या हत्येचा उलगडा झाला. विरार पोलीस ठाण्यात अल्पवयीन मातेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
रुमालाने तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधले, 23 वर्षीय विवाहितेची विहिरीत आत्महत्या
बाळाचं अपहरण, नंतर हत्या करुन खाडीत पुरलं, पैसे दिले नाही म्हणून तृतीयपंथीचं अमानवीय कृत्य