अंधेरी परिसरात भावोजीने मेव्हण्याला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !

| Updated on: Sep 09, 2022 | 4:36 PM

इंद्रजित दारूच्या नशेत होता आणि त्याला शिवीगाळ करू लागला. यामुळे लड्डू कुमारला राग आला आणि त्याने जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केले.

अंधेरी परिसरात भावोजीने मेव्हण्याला संपवले, कारण ऐकून थक्क व्हाल !
अंधेरी परिसरात भावोजीने मेव्हण्याला संपवले
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : किरकोळ कारणावरुन एका व्यक्तीने आपल्या मेव्हण्याला संपवल्या (Killed)ची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. इंद्रजीत पासवान असे 45 वर्षीय मयत इसमाचे नाव आहे. तर लड्डू कुमार असे 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. मयत इंद्रजीत आणि आरोपी लड्डू कुमार हे एकमेकांचे मेहुणा आणि भावोजी आहेत. अंधेरी पोलिसांनी आरोपी लड्डू कुमारला अटक (Arrest) केले आहे. इंद्रजीतने नशेत लड्डू कुमारला शिवीगाळ (Abusing) केल्याने त्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते.

चार दिवसापूर्वीच नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता

इंद्रजीत पासवान हा चार दिवसांपूर्वीच नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. मुंबईत तो आपला नातेवाईक राम किशोरसोबत राहत होता. राम किशोरसोबत त्याचा अन्य एक नातेवाईक लड्डू कुमारही राहत होता. लड्डू कुमार नात्याने इंद्रजीतचा भावोजी होता.

राम किशोर घरी आल्यानंतर सर्व प्रकार उघड

मंगळवारी सायंकाळी उशिरा राम किशोर हा गणपती दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन तो परत आला तेव्हा राम किशोरला इंद्रजित त्याच्या दुकानाबाहेर खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. राम किशोरने त्याचा भाऊ देवेंद्र याला बोलावून घेतले आणि इंद्रजीतला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

अंधेरी पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासात राम किशोरचा त्याच्यासोबत राहणारा नातेवाईक लड्डू कुमार बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीची चौकशी केली असता हत्येची कबुली

रामकिशोरच्या दुकानाची झडती घेतली असता आत लडू कुमार लपलेला आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. इंद्रजित दारूच्या नशेत होता आणि त्याला शिवीगाळ करू लागला. यामुळे लड्डू कुमारला राग आला आणि त्याने जवळच पडलेल्या लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केले.

आम्ही लड्डू कुमारला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. या दोघांमध्ये काही जुने वैमनस्य होते की हत्येमागे आणखी काही कारण होते, याबाबतही तपास करत आहोत, असे झोन ​​10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.