मुंबई : भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून दूधविक्री केली जात होती. टोळीकडून 180 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. (Milk adulteration gang busted in Mumbai)
भेसळयुक्त दूध विकणारी टोळी
नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून ही टोळी त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळत असे. अशाप्रकारे भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या मुंबई उपनगरातील सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. भेसळयुक्त दूध प्यायल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची भीती आहे.
180 लिटर भेसळयुक्त दूध जप्त
सांताक्रुझच्या जांभळी पाडा येथील एका घरामध्ये अमूल, महानंदा, अन्नपूर्णा यासारख्या नामांकित दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करणाऱ्या युवकाला अन्न आणि औषध प्रशासन युनिट 9 गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून 180 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. अशाच प्रकारे काल युनिट क्रमांक 11 च्या पथकाकडून गोरेगाव आणि मालाड परिसरातील दुधामध्ये भेसळ करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
पिशवीतील दूध घेताय, सावधान! अमूल दुधात भेसळ करणाऱ्या टोळीला अटक
(Milk adulteration gang busted in Mumbai)