Mumbai Best Bus Accident : बेस्ट बसचं पुढच्या बाजूचं डावं चाक वृद्धेच्या शरीरावरुन धडधडत गेलं आणि…

| Updated on: Oct 29, 2022 | 3:02 PM

मुंबईत एकाच महिन्यातला बेस्ट बसचा तिसरा जीवघेणा अपघात! अपघाताचं कारणही काळजी वाढवणारं

Mumbai Best Bus Accident : बेस्ट बसचं पुढच्या बाजूचं डावं चाक वृद्धेच्या शरीरावरुन धडधडत गेलं आणि...
बेस्ट बस
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मुंबईमध्ये बेस्ट बसचे वाढते अपघातात (Mumbai Best Bus Accident) काळजी करायला लावणारे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या ऑक्टोबर महिन्यात तीन जीवघेणे अपघात झाल्याची नोंद समोर आली आहे. यात दोघांचा दर्दैवी अंत झाला आहे. गुरुवारी झालेल्या एका अपघातात बेस्ट बसने (Best Bus News) वृद्ध महिलेला चिरडलं. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. कुर्ला पश्चिमेला (Kurla West) ही घडली होती. दरम्यान, यात आठवड्याच्या सुरुवातील एका 22 वर्षांच्या तरुणालाही बसने धडक दिली होती. या अपघातात चिरडला गेलेले तरुणही गंभीररीत्या अपघातात जखमी झाला. चुनाभट्टी इथं हा अपघात घडला होता.

गेल्या महिन्याभराच्या आत 3 बस अपघातात दोघांनी प्राण गमावला आहे. तर एक तरण जायबंदी झाला आहे. याआधी गोवंडी इथं शिवाजी नगर जवळ एका शालेय विद्यार्थ्याल बसने धडक दिली होती. यात तरुणाचा जागीच जीव गेला होता.

कुर्ला पश्चिमेला गुरुवारी बस क्रमांक 310ने एका वृद्ध महिलेला चिरडलं. यानंतर बसचा पुढच्या बाजूचं डाव चाक वृद्ध महिलेच्या शरीरावरुन धडधडत गेलं. यात महिलेच्या पायाला आणि कंबरेला जबर मार बसला. या दुर्दैवी अपघातात वृद्ध महिला ठार झाली.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातील सेल्समनचं काम करणारा अतिश अहिरे हा चेंबूरमधील तरुणही बस अपघातामुळे जखमी झाला. अतिश बाईकवरुन जात असताना चुनाभट्टी इथं त्याच्या बसला धडक दिली. यात धडकेत अतिश गंभीर जखमी झाला.

या अपघातप्रकरणी अतिशच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर बस चालकाला अटकही करण्यात आली. पण नंतर हा बस चालक जामिनावर सुटला होता.

दरम्यान, वाढत्या बस अपघातांना नेमकी कोणती गोष्ट जबाबदार आहे, यावरुन पालिकेचे माजी विरोधी नेते रवी राजा यांनी गंभीर आरोप केला आहे. भाडेतत्त्वावर काही बेस्ट बस चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत. या बसचे चालक बेशिस्तपणे बस चालवत असल्यामुळे अपघात वाढले असल्याचं राजा यांनी म्हटलं आहे.

भाडेतत्त्वावर ज्या बस चालवण्यासाठी देण्यात आल्या आहेत, त्या बसच्या चालकांना शिस्त लावण्याची गरज असल्याचं रवी राजा यांनी म्हटलं आहे. बेशिस्त बस चालकांमुळे निष्पांपा जीव गमवावा लागत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.