Mumbai : पोलिसाने मुख्यमंत्री शिंदेंसोबत असं काय केलं की शिक्षा म्हणून 100 रुपये दंड भरावा लागला?

| Updated on: Aug 28, 2022 | 12:19 PM

22 ऑगस्टच्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा ताफा नरीमन पॉईन्टवरुन रवाना होणार होता. या दिवशी सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता, त्यावेळी वाहतुकीची कोंडी होती. ही वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली होती.

Mumbai : पोलिसाने मुख्यमंत्री शिंदेंसोबत असं काय केलं की शिक्षा म्हणून 100 रुपये दंड भरावा लागला?
मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्र्यांसोबत (CM Eknath Shinde Convoy) झालेली चूक एका पोलीस अधिकाऱ्याला (Mumbai Police News) भोवली. इतकी की त्याला चक्क 100 रुपये दंड भरावा लागला. आता तुम्ही म्हणाल की, 100 रुपये दंड काय भरपूर थोडीच आहे! तुमचं म्हणणंही तसं बरोबरच आहे. पण त्याआधी या पोलिसाने नेमकी चूक काय केली आणि त्याच्याकडून शिक्षेच्या स्वरुपात घेण्यात आलेला 100 रुपये दंड (Police to pay 100 rs as Fine) खरंच योग्य होता का, हेही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. ही घटना घडली 22 ऑगस्ट रोजी. मुख्यमंत्र्याचा ताफा जात असतेवेळी झालेली चूक मुंबई पोलिस दलातील एका सहाय्यक उपनिरीक्षकाला भोवला. यावेळी घडलेली नेमकी त्याची चूक काय होती, तेही जाणून घेऊयात.

‘ही’ चूक भोवली

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, 22 ऑगस्टच्या सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा ताफा नरीमन पॉईन्टवरुन रवाना होणार होता. या दिवशी सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता, त्यावेळी वाहतुकीची कोंडी होती. ही वाहतूक कोंडी नियंत्रित करण्याची जबाबदारी ड्यूटीवर असलेल्या कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. पण वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं नाही. वाहतूक कोंडी फुटली नाही. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आली आणि वाहतूक नियंत्रित करता न आल्याचा ठपका एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर ठेवण्यात आला.

एअर इंडिया इमारतीजवळील गेंडा पॉईन्ट येथे वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले पोलीस अधिकारी अपयशी ठरल्यानं वरिष्ठांच्या निदर्शनास आलं. याला जबाबदार एएसआय म्हणजेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असल्याचं मानत त्यांच्यावर दंडाची शिक्षा करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.

हे सुद्धा वाचा

वरिष्ठांनी फटकारलं

वाहूतक नियंत्रणात येत नाही, कोंडी वाढतेय हे पाहून अखेर वरिष्ठ पोलिसांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. त्यांनी तातडीनं पुढली पावलं उचचली. ट्रॅफिक दूर करत संपूर्ण वाहतूक नियंत्रणात आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढील दिशेने रवाना करण्यात आला. आपल्या कर्तव्यात कसूर झाल्यामुळे आणि जबाबदारी योग्य रीत्या हाताळता न आल्यानं वरिष्ठांनी त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला फटकारलं. इतकंच काय तर त्याला नंतर 100 रुपयांचा दंडही भरायला लावला.