मुंबई : एखाद्याला ‘आय लव्ह यू’ म्हटलं तर काय शिक्षा होऊ शकते? किती दिवसांनंतर होऊ शकते? याची उत्तर केसनुसार वेगळवेगळी असू शकतात… पण सध्या मुंबईतील अशी एक केस चर्चेत आहे. 13 वर्षांच्या मुलीला ‘आय लव्ह यू’ (I Love You) म्हणाला म्हणून 7 वर्षांनंतर आरोपीला 1 वर्षांच्या कारावासाची शिक्षा (Crime News) झाली आहे. 2015 मध्ये एका 13 वर्षांच्या मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याप्रकरणी आणि तिचा वारंवार पाठलाग केल्याप्रकरणी एका 30 वर्षांच्या तरुणाला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेता आणि तो सराईत गुन्हेगार नाही. आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. अपील कालावधी संपल्यानंतर ही रक्कम हयात असलेल्या व्यक्तीला द्यायची आहे, असंही कोर्टाने म्हटलंय.
आठवीत असणाऱ्या एका मुलीसोबत 2015 मध्ये ही घटना घडली आहे. 17 एप्रिल 2015 रोजी दुपारी 4 वाजता ती आईसोबत पाठ्यपुस्तकं खरेदीसाठी बाहेर गेली होती. काही तासांनंतर ते घरी परतत असताना तिची चप्पल तुटली. त्यावेळी एका तरूणाने तिची अडवणूक केली. आरोपी तिच्या जवळ आला. तिला आय लव्ह यू म्हणाला… त्यामुळे तिने आरडाओरडा करून आईला पुन्हा मागे बोलावलं. तिने तिच्या आईला सांगितलं की तोच माणूस आहे जो पंधरा दिवसांपासून तिच्या मागे लागला होता. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला, असं फिर्यादीचं म्हणणं आहे.
पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मी असं काहीही केलेलं नाही. मला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आलं आहे. त्याच्या म्हणण्याला पुराव्यांचा आधार नसल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.
आरोपीने केलेल्या गुन्ह्यांचं स्वरूप आणि गंभीरता लक्षात घेता आणि तो सराईत गुन्हेगार नाही. आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. अपील कालावधी संपल्यानंतर ही रक्कम हयात असलेल्या व्यक्तीला द्यायची आहे,असंही कोर्टाने म्हटलंय.