मुंबई : शहरात जुगार अड्डे सक्रिय केल्याप्रकरणी मटका क्वीन जया छेडा (Matka Queen Jaya Chheda) विरोधात मुंबई गुन्हे शाखेने 13 नवे गुन्हे नोंदवले आहेत. फसवणूक (Cheating) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जयावर आरोप (Allegation) ठेवण्यात आले आहेत. जयाला तिचा पती आणि मटका क्वीन सुरेश भगत याच्या हत्येप्रकरणी 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुरेश भगतच्या हत्येप्रकरणी जयासह इतर पाच जणांना दोषी ठरवले होते. 2008 मध्ये सुरेश भगतची हत्या झाली होती.
मुंबई उच्च न्यायालयाने आजारपणामुळे जयाला 2018 मध्ये जामीन मंजूर केला होता. फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत जयावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेकायदेशीर असलेल्या राज्यातील सर्वात प्रसिद्ध लॉटरी प्रणालींपैकी एक असलेल्या कल्याण मटका चालवण्यात तिचा सहभाग असल्याचा अधिकार्यांना संशय आहे. मुंबईत कल्याण भगत व्यतिरिक्त रतन खत्री हा एकमेव व्यक्ती होता, ज्याला मटका किंग म्हटले जात होते.
आपल्याविरोधात दाखल केलेले सर्व गुन्हे खोटे आहे. आपल्याला खोट्या आरोपात गोवण्यात आल्याचा दावा जयाने केला आहे. तसेच जयाने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याच आठवड्यात जयाच्या याचिकांवर कोर्ट सुनावणी घेण्याची शक्यता आहे.
अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत जयावर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मटका क्वीन जयाच्या काही अटकपूर्व जामीन याचिका 2022 मध्ये दाखल केलेल्या खटल्यांप्रकरणी आहेत. तर एक याचिका ती तुरुंगात असताना 2014 च्या खटल्याशी संबंधित आहे.
2014 च्या प्रकरणातील खटल्याचा तपास पूर्ण झाला आहे; त्यामुळे जयाला कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद जयाच्या वकिलांनी केला होता. न्यायालयानेही या युक्तिवादाशी सहमती दर्शवली आणि गेल्या महिन्यातच 2014 च्या खटल्यात जयाची याचिका मान्य केली होती.
मुंबईत सर्वप्रथम कल्याणजी भगत याने मटका सुरू केल्याचे मानले जाते. जयाचा माजी पती सुरेश भगत यालाही वडिलांप्रमाणे मटका किंग म्हटले जात होते. मात्र, 2008 मध्ये भगत याचा अपघाती मृत्यू झाला.
मात्र सुरेश याचा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा आरोप झाला होता. मटका व्यवसायावर ताबा मिळवण्यासाठी जयानेच सुरेशची हत्या घडवून आणल्याचा आरोप होता. पोलीस तपासात हे आरोप सिद्ध झाले आणि जयासह पाच जणांना शिक्षा झाली.