मुंबई / 15 ऑगस्ट 2023 : अंधेरीत एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 8 ने ही कारवाई केली. याप्रकरणी 13 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 12 जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींना 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपी दिल्लीचे रहिवासी असून, मुंबई आणि दिल्लीत हे रॅकेट चालवत होते. आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत नागरिकांची फसवणूक करायचे. रॅकेटचा पर्दाफाश होताच अनेक जण समोर येऊन फसवणुकीची तक्रार देत आहेत.
अंधेरीतील मरोळ परिसरात बनावट कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 8 आठने शुक्रवारी या कॉल सेंटरवर छापा टाकला. यात एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी 12 जणांना केली आहे. मृदुल जोशी असे मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. आरोपी Google, Facebook आणि Instagram सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सवलतीत विमान तिकिटाची जाहिरात करायचे.
ही जाहिरात पाहून नागरिक तिकिटासाठी संपर्क साधायचे. नागरिकांकडून लुटलेले पैसे आरोपी वेगवेगळ्या खात्यात वळते करायचे. आरोपींनी 400 अधिक बँकखाती खोलली होती. दररोज आरोपी चार ते पाच नागरिकांना लक्ष करुन पैसे लुटायचे. अखेर या कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आहे. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ग्राहकांनी ई-मेलद्वारे मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली आहे.