मुंबई : मुंबईच्या कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आाग लागली होती. आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ही रहिवासी इमारत असल्याने अनेक जण इमारतीत अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी रेक्स्क्यू ऑपरेशन सुरु आहे. परिसरात सर्व धुराचे लोट निघत असल्याने नागरीक भयभीत झाले.
नविन टिळक नगर परिसरात ही इमारत आहे. आज दुपारच्या सुमारास येथील एका इमारतीला भीषण आग लागली. अग्मीशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी दाखल झाली. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.
इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील एका फ्लॅटला आग लागली होती. जीव वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरु असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अनेकीकांनी गॅलीरीतून उतरुन स्लॅबवर थांबवून मदत मागितली.
इमारतीच्या डकमध्ये साचलेल्या कच-्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.