मुंबई : घरगुती भांडणांना वैतागून राग अनावर झाल्यामुळे सख्ख्या बापाने टोकाचं पाऊल उचललं. पित्याने आपल्या पोटच्या तीन मुलांनाच आईस्क्रिम म्हणून उंदीर मारायचं औषध पाजल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. मुंबईतील मानखुर्द भागातील साठे नगरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Mumbai Mankhurd Father feeds rat kill poison to three children who asked for ice cream)
नेमकं काय घडलं?
मोहम्मद अली नौशाद अन्सारी असे आरोपी पित्याचे नाव आहे. 25 जूनला मुलीने त्याच्याकडे आईस्क्रिम मागितले. त्यावेळी मोहम्मद अली नौशाद अन्सारीने आपल्या तिन्ही मुलांना उंदराचे औषध खायला दिले. त्यानंतर मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार
या घटनेत अलिशान मोहम्मद अली अन्सारी या 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून इतर दोन मुलं अलीना (7 वर्ष) आणि अरमान (2 वर्ष) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने मानखुर्द परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलांची आई नाजिया हिने दिलेल्या तक्रारीनुसार मानखुर्द पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी बाप पसार
या प्रकरणी मुलाचे वडील आरोपी मोहम्मद अली नौशाद अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो तीन दिवसांपासून फरार आहे. पोलिसांकडून तपास सुरु आहे. लवकरच आरोपीला पकडण्यात येणार असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गोंदियात चिमुकल्या मुलीची बापाकडून हत्या
दरम्यान, खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी गोंदियात उघडकीस आला होता. जन्मदात्याने अवघ्या 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला होता. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
संबंधित बातम्या :
आईस्क्रिममध्ये विष मिसळून आत्महत्येचा प्रयत्न, महिला बचावली, अनवधानाने मुलगा-बहिणीचा मृत्यू
रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या
(Mumbai Mankhurd Father feeds rat kill poison to three children who asked for ice cream)