मुंबई : मुंबईच्या (Mumbai) मानखुर्द रेल्वे स्टेशनवर (Mankhurd Railway Station) एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईच्या वाशीहून जीआरपीने अटक केली आहे. तर, आरपीएफच्या दोन जवानांना निलंबित करण्यात आलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर शनिवारी (20 नोव्हेंबर) सकाळी 4 ते 4:30 च्या दरम्यान एक हत्येची थरारक घटना घडली. येथे एका व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीवर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याचा खून केला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक असल्याची माहिती आहे.
सकाळी 4 ते 4:30 च्या दरम्यान सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलच्या लगेज डब्ब्यातून एक व्यक्ती खाली उतरला. त्यानंतर तो प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या दीपकच्या दिशेने जातो आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये दीपकचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच मुंबई क्राईम ब्रांचला मिळाल्याच्या 12 तासातच आरोपीला नवी मुंबईच्या वाशी येथून अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
दीपकची हत्या का झाली, हे दोघं एकमेकांना आधीपासून ओळखत होते की ट्रेनमधील कुठल्या वादानंतर ही घटना घडली?, यासर्व बाजुने पोलीस तपास करत आहेत.
सकाळच्या सुमारास रेल्वे स्थानकावर इतकी मोठी घटना घडली. पण, त्यावेळी आरपीएफ किंवा जीआरपीचा कोणताही जवान घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे आरपीएफच्या दोन जवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पूजा कावळे हत्याकांड: पतीच निघाला हत्येचा मास्टरमाईंड, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यातhttps://t.co/O8PKeyLHSP#PujaKawale |#Murder |#Husband |#Mastermind
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2021
संबंधित बातम्या :
कल्याणमध्ये अज्ञात कारणावरून रिक्षाचालकाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या