मुंबई : एका 25 वर्षांच्या तरुणाची मुंबईत हत्या (Mumbai Murder Case) करण्यात आली. अंधेरीत घडलेल्या या हत्येनं खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी (Mumbai Police) अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला असून आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. अंधेरी पश्चिमेच्या सात बंगला येथील बस डेपोमध्ये हे थरारक हत्याकांड घडलं. हत्या (Mumbai crime News) करण्यात आलेला तरुण हा एक गिटारीस्ट होता. रस्त्यावर गिटार वाजवून लोक उदरनिर्वाह करत होता. या तरुणाच्या डोक्यावर चक्क पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बस डेपोच्या दिशेने धाव घेत मृतदेहाचा आढावा घेतला. यानंतर मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटवण्याचं कामही पोलिसांकडून केलं जात होतं. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या अंधेरी परिसरात झालेल्या या हत्याकांडाच्या घटनेनं मुंबईत हत्याकांडाचं सत्रच सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. रविवारी सकाळी पोलिसांना या हत्येबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आलंय.
अंधेरी पश्चिमेला असलेल्या सात बंगला परिसरात बस डेपोमध्ये एक मृतेदह रविवारी सकाळी आढळून आला होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या होत्या. या जखमा पेव्हर ब्लॉकने घाव घालवून करण्यात आल्याचंही दिसून आलं. दरम्यान, हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सुरज तिवारी असं असून सूरजचं वय 25 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. सूरज हा दिल्लीच्या पालम इथला मूळचा राहणारा असून तो पोटापाण्यासाटी मुंबईत आला असल्याची शंका घेतली जातेय. तो मुंबईत रस्त्यावर गिटार वाजवून गुजराण करायचा. दरम्यान, आता त्याची हत्या करण्यात आल्यानं अनेक सवाल उपस्थित झालेत.
25 वर्षीय गिटारीस्ट सूरजची हत्या कुणी केली, का केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हानं सध्या अंधेरी पोलिसांसमोर आहे. सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह बस डेपोत असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गंभीर पावलं उचलत तत्काळ मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणीसाठी पाठवला. सूरजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं. त्यावरुन पेव्हर बॉकने ठेचून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.
आता वर्सोवा पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला असून पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. वर्सोवा पोलीस स्थानिकातील वरीष्ट पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनी याबाबतची माहिती दिलीय.
ही घटना उघडकीस आल्यानंतर आता मुंबईत हत्येचं सत्रच सुरु असल्याचं पाहायला मिळालंय. शनिवारी धारावीतही एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आलेली. तर दक्षिण मुंबईत शनिवारी पहाटेच एका पतीनं आपल्या बायकोला भोसकलं होतं. तर इतके कांदिवली सोमवारी सकाळी तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर आता शनिवारीच आणखी एक हत्या अंधेरीत झाल्याचं उघडकीस आलंय.