मुंबई / 31 जुलै 2023 : जयपूरहून मुंबईकडे येत असलेल्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटे 5.23 वाजता पालघर स्थानकादरम्यान गोळीबाराची घटना घडली. या घटनेत आरपीएफच्या ASIसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. आरपीएफच्या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केला. एस्कॉर्ट ड्युटीवर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन आणि ASI टीकाराम यांच्या काही कारणातून वाद झाला. हा विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात कॉन्स्टेबलने स्वतःकडील सर्व्हिस रायफलने ASI टीकाराम यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा करत त्याला जाब विचारण्यास सुरवात केल्याने चेतने तीन प्रवाशांवरही गोळीबार केला. यानंतर आरोपीने चैन ओढून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपी पोलिसांनी त्याला पकडले.
बोरीवली लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यानंतर आजच त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरपीएफच्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासादरम्यान काही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या जवानांना तैनात केले जाते.
आरोपी चेतन आणि मयत ASI दोघेही पॅसेंजरमधील बी-5 या एसी बोगीत एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होते. सूरत-मुंबई अशी दोघांची ड्युटी होती. दोघांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादातून चेतने ASI टीकारामवर गोळी झाडली. ASI वर गोळी झाडल्याने तेथील प्रवाशांनी आरडाओरजा करण्यास सुरवात केली. प्रवाशांनी कॉन्स्टेबलला जाब विचारायला सुरवात करताच आरोपीने त्यांच्यावरही गोळीबार केला.
यानंतर पॅसेंजर मीरा-रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान येताच आरोपीने चैन खेचून ट्रेनमधून उतरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जीआरपीने त्याला पकडले. पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी क्रॉस फायरिंग झाली का याबाबतही चौकशी सुरु आहे.