मुंबई : समाज पुढारलेला होत चाललाय. आपल्याला देश पुरोगामीत्वाकडे चालल्याचे अनेक दावे-प्रतिदावे होताना दिसतात. मात्र, काही घटना अशा घडतात ज्या आपल्याला पुन्हा वास्तव्याची जाणीव करुन देतात. या घटना आपल्या विचारांना पुन्हा जमीनीवर आणतात आणि आणखी विचार करायला भाग पाडतात. आम्ही जी बातमी तुम्हाला सांगणार आहोत त्यातील घटना ही विकृत आहे. पण या घटनेने आपल्याला, समाजाला विचार करायला लावणं भाग पाडलं आहे. त्यामुळे यावर योग्य विचार होऊन तोडगा काढणं जास्त आवश्यक आहे. ऑनलाईन क्लास सुरु असताना एक अल्पवयीन मुलगा कॅमेऱ्यासमोर हस्तमैथून करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे Mumbai (Police arrest Minor boy who Masturbation in front of the camera while online class is going on).
बैजूस कंपनीच्या व्हाईट हॅट ज्युनियर वेबसाईटवर ऑनलाईन कोडिंग क्लास सुरु होता. यावेळी सहभागी असलेल्या एका विद्यार्थ्याने विकृत कृत्य केलं. त्याने कॅमेऱ्यासमोर पॅन्टची चैन उघडली आणि तो हस्तमैथून करायला लागला. यावेळी ऑनलाईन क्लास सुरु होता. त्याच्या या अश्लील कृत्याविरोधात कडक कारवाई करण्यात आली. संबंधित ऑनलाईन क्लास आयोजकांनी त्याच्याविरोधात मुंबईतील साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली (Mumbai Police arrest Minor boy who Masturbation in front of the camera while online class is going on).
तक्रार मिळाल्यानंतर सकीनाका पोलिसांनी अज्ञात विद्यार्थ्याविरोधात आयपीसी कलम 354 (अ) (3), 354 (ड) आणि माहिती तंत्रज्ञान कलम 67 अन्वये गुन्हा दाखल केला. तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांना एक मोबाईल नंबर सापडला, ज्याच्या जागेचा मागोवा घेण्यात आला होता आणि हा नंबर राजस्थानच्या जैसलमेर येथून आला असल्याचे निष्पन्न झालं. साकिनाका पोलिसांचं एक पथक तिथे गेलं. तपास केल्यानंतर इयत्ता 9 वी मध्ये शिकणारा 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने संबंधित कृत्य केल्याचं उघड झालं.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाचं घर गाठलं. त्याला या कृत्याचं कारण विचारलं. त्यावर त्याने सहज केलं, असं उत्तर दिलं. या मुलाने पोलिसांना लॉगिनसाठी चुकीचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिला. तपासाअंती तोच गुन्हेगार असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी मुलाला जैसलमेरच्या कोर्टात हजर केले, कोर्टाने त्याला सुधारगृहात पाठविले आहे. संबंधित घटनेतून ही घटना का घडली, मुलांना योग्य वयात लैंगिक शैक्षणाची आवश्यकता, या विषयांवर विचार होणं जास्त गरजेचं असल्याचं अधोरेखित होतंय.
हेही वाचा : मोठी बातमी ! गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर दोन जणांची पाळत, सातारा पोलिसांना तपासाचे आदेश