मुंबई वाहतूक पोलिसांचे अनोखे ‘ब्रम्हास्त्र’; जनजागृतीसाठी उचलले ‘हे’ सोशल पाऊल

| Updated on: Sep 13, 2022 | 8:26 PM

वाहतूक पोलिसांनी भरधाव ड्रायव्हिंग आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे यांसारख्या नियम उल्लंघनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांचे अनोखे ब्रम्हास्त्र; जनजागृतीसाठी उचलले हे सोशल पाऊल
मुंबई वाहतूक पोलिसांचे अनोखे 'ब्रम्हास्त्र'
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मीम्स (Memes) आता केवळ मनोरंजनासाठी राहिलेल्या नाहीत. अशा प्रकारच्या मीम्स जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. राजकीय पक्ष, सरकार, विविध संस्था, पोलीस इत्यादी हल्ली माहिती व जागरूकता पसरवण्यासाठी या मीम्सचा वापर करीत आहेत. हाच ट्रेंड जोपासत मुंबईच्या वाहतूक पोलिसां (Traffic Police)नी मंगळवारी ट्विटरवर जाऊन ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या अलीकडच्या चित्रपटावर आधारित मीम्सचा वापर केला.

‘जुनून’ आणि ‘रफ्तार’ तुमचे ‘विश्व’ धोक्यात आणेल!

वाहतूक पोलिसांनी भरधाव ड्रायव्हिंग आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे यांसारख्या नियम उल्लंघनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. ‘जुनून’ आणि ‘रफ्तार’ तुमचे ‘विश्व’ धोक्यात घालू शकतात. सुरक्षितपणे ड्रायव्हिंग करणे हे कायमचे सर्वात मोठे ‘अस्त्र’ आहे,” असे ट्विट मुंबई वाहतूक पोलिसांनी ब्रह्मास्त्र चित्रपटातील छायाचित्रासह केले आहे.

हे सुद्धा वाचा

रहदारीच्या नियमांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी शहर पोलिसांनी केलेल्या या अनोख्या जनजागृतीचे मुंबईकरांकडून कौतुक केले जात आहे.

सर्वप्रथम बंगळुरू पोलिसांनी केला होता मिम्सचा वापर

नियम आणि नियमांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभरातील वाहतूक पोलिस मीम्स वापरत आहेत. अशा प्रकाच्या मीम्स सहसा ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्या जातात.

या ट्रेंडची सुरुवात खरंतर 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी बंगळुरू पोलिसांनी प्रसिद्ध HBO मालिका गेम ऑफ थ्रोन्समध्ये लॉर्ड ऑफ लाइटशी संबंधित ट्रॅफिक लाइट्सशी संबंधित काही मीम पोस्ट केल्या होत्या.

बालभिकारी रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी घेतला होता पुढाकार

नागपूर पोलिसांनी देखील लहान मुलांकडून भीक मागण्याच्या समस्येबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मीम्सचा वापर केला होता. पोलिसांनी नागरिकांना लहान मुले जर भीक मागताना आढळली, तर त्यांची तक्रार करण्यास सांगण्यासाठी मीम्सचा वापर केला होता.

जेणेकरुन प्रशासन ती समस्या सोडवण्यासाठी हस्तक्षेप करू शकेल. यामुळे लहान मुले भीक मागण्याच्या कामात गुंतणार नाहीत. त्या मुलांना योग्य शिक्षण मिळत आहे याची खात्री केली जाऊ शकेल, यादृष्टीने नागपूर पोलिसांनी तो उपक्रम राबवला होता.