नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत मोटारसायकल चोरणाऱ्या 3 चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पकडलेल्या आरोपींकडून 9 मोटरसायकल सह एकूण 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश यांना गुप्त माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी जेरबंद केलेले तीनही आरोपी तरुण पंचविशीतील आहेत. दोघांचं वय 25 तर एकाचं 27 वर्षे आहे. या प्रकरणात कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे, एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये दोन, तसेच रबाळे, सीबीडी आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येकी एक असे गुन्हे उघडकीस आले आहेत (Navi Mumbai Police arrest bike thieves).
कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश येवले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी रोहित तुपे, सिद्धार्थ मोर्या, भुपेश मुकणे यांनी आपसात संगणमत करून कोपरखैरणे, रबाळे, ए. पी. एम. सी., सी. बी. डी., पनवेल या परीसरांमधून मोटारसायकली चोरलेल्या आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तीनही आरोपींनी पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपले गुन्हे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून 9 मोटारसायकलसह एकूण 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी अटक केलेल्या तिघांपैकी रोहित तुपे उर्फ चिक्क्या आणि सिद्धार्थ मोर्या यांच्यावर तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्यांची कसून चौकशी करत असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे (Navi Mumbai Police arrest bike thieves).
काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी देखील धडाकेबाज कारवाई केली होती. पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. काही तरुण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी चोरी करायचे. नंतर त्याच दुचाकी दिवसा फिरवायचे. त्यांच्याकडे दर दोन दिवसात नवनवीन दुचाकी कशा? असा प्रश्न स्थानिकांना वाटायचा. अखेर याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.
हेही वाचा : कामधंदे नाही, नवनव्या गाड्या फिरवून शायनिंग मारायचे, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड