मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर जसे महाराष्ट्रात एकामागोमाग गुन्हे दाखल झाले. तीच गोष्ट आता नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याबाबत व्हायला सुरुवात सुरुवात झाली आहे की काय, अशी शंका घेतली जातेय. नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांना खार पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर खार पोलीस ठाण्यातच (Khar Police Station) दुसरा गुन्हा दाखल झालाय. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना शनिवारी पोलीस कोठडीत रात्र काढावी लागली. त्यानंतर त्यांना सांताक्रूझच्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं. खार पोलीस ठाण्याची कोठडी सांताक्रूझ हद्दीत येत असल्यानं त्यांची रवानगी सांताक्रूझ इथं करण्यात आली. दरम्यान, आता दुसऱ्याच दिवशी राणा दाम्पत्यावर दुसरा गुन्हा दाखल कलम 353 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरीकडे उस्मानाबादेतही राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंडे यांच्यासह 4 जणांनी गुन्हा नोंद करण्याची तक्रार दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरले आणि दोन समाजात तेढ निर्माण करून तणावाचे वातावरण निर्माण करीत राज्याचे कायदा सुव्यवस्था बिगडविल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. शिवसैनिकाच्या भावना दुखाविल्याने राणा दामपत्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
दरम्यान, खारमध्ये नवनीत राणा यांच्या घराबाहेर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अज्ञात व्यक्तीविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शनिवारी खार पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती.