आरटीआय कार्यकर्त्याला नवाब मलिकांच्या धाकट्या भावाने धमकावलं? इक्बाल मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल

| Updated on: Aug 08, 2022 | 7:06 AM

Mumbai Crime News : कुर्ला पोलिसांनी सोनकांबळे यांची तक्रार घेतली असून अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

आरटीआय कार्यकर्त्याला नवाब मलिकांच्या धाकट्या भावाने धमकावलं? इक्बाल मलिक यांच्याविरोधात तक्रार दाखल
धक्कादायक
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : एका आरटीआय कार्यकर्त्याने (RTI Activist) नवाब मलिक यांच्या धाकट्या भावाविरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांचा धाकटा भाऊ इक्बाल मलिक (Iqbal Malik Younger brother of Nawab Malik) याने आरटीआय कार्यकर्त्याला धमकावलं होतं. विनोद सोनकांबळे (Vinod Sonkambale) यांनी याबाबतची तक्कार दिल्याची माहिती समोर आली आहे. बीएमसीच्या वॉर्ड ऑफिसात धमकी दिल्याचा आरोप इक्बाल मलिक यांच्या सोनकांबळे यांनी केला आहे. कुर्ल्यात हा प्रकार घडला होता. गेल्या महिन्यात धमकी देण्यात आली असून अवैध बांधकामाविरोधात आवाज उठवल्यानंतर आपल्याला इक्बाल मलिक यांनी दमदाटी करत धमकावल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विनोद सोनकांबळे यांनी केला आहे. दरम्यान, इक्बाल मलिक यांनी धमकीचे आरोपांचं खंडन केलं आहे विनोद यांनी केलेले आरोप आणि तक्रार निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

नेमकं काय प्रकरण?

याच वर्षी मे महिन्यात विनोद सोनकांबळे यांनी बीएमसीकडे बेकायदा बांधकामाविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये तब्बल 80 बेकायदा बांधकामांची यादी देण्यात आलेली. त्यातील बेकायदेशीर बांधकामं ही गुलाम मुस्तफ्फा मलिक यांच्याशी निगडीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विनोद सोनकांबळे यांनी केलेल्या आरोपांनुसार बेकायदेशीर बांधकामावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर 25 जुलै रोजी पालिकेनं बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जारी केले होते.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे पालिकेनं कारवाईचे आदेश दिल्यानंतर सोनकांबळे हे वॉर्ड ऑफिसात दाखल झाले होते. तिथे त्यांना धमकावण्यात आलं, असं त्यांनी म्हटलंय. नवाब मलिक यांचा भाऊ इक्ब्ल मलिक हा गुलाम मुस्तफ्फा मलिक याला ओळखत असून गुलामने केलेल्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात आवाज उठवल्यामुळे आपल्याला धमकावण्यात आलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

कुर्ला पोलिसांनी सोनकांबळे यांची तक्रार घेतली असून अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे इक्बाल मलिक यांनी मात्र विनोद सोनकांबळे यांच्या आरोपांचं खंडन केलंय. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे आणि निराधार आहेत, असं त्यांनी म्हटलंय. मी कोणालाही धमकी दिलेली नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.