Palghar : मृत्यूला चकवा! वीज खांब चालत्या बाईकवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी, दैव बलवत्तर म्हणून बचावला

| Updated on: Aug 09, 2022 | 1:55 PM

धावत्या बाईकवर वीज खांब पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

Palghar : मृत्यूला चकवा! वीज खांब चालत्या बाईकवर पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी, दैव बलवत्तर म्हणून बचावला
भीषण..
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पालघर : बाईकवरुन (Bike Accident Video) जात असताना अचानक रस्त्यावरील वीज खांब (Electric Poll) पडल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. ही दुर्घटना पालघर मधील बोईसर-नवापूर रोड येथील कोलवडे इथं घडली. या अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाचं नाव योगेश पागधरे आहे. गंभीररीत्या जखमी झालेल्या योगेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे महावितरण विभागाचा (Mahavitaran) भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. मुसळधार पावसात अनेकदा वीज खांब, झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी पाहणी आणि खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जाते. बहुतांश वेळा अनुचित प्रकार टाळण्यासाठी रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडांची छाटणीही प्रशासनाकडून केली जाते. तसंच विजेच्या खांबाचीही वेळोवेळी पाहणी करणं गरजेचं असतं. मात्र योग्य ती खबरदारी वेळीच करण्यात न आल्यानं एक दुचाकीस्वार तरुण जायबंदी झाला आहे.

थोडक्यात वाचला

धावत्या बाईकवर वीज खांब पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. वीज खांब हटवेपर्यंत बोईसर-नवापूर रोडवरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान, वीज खांब पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर अखेर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विजेचा खांब पडल्यानं याचा परिणाम वीज वितरणावरही झालाय. सुदैवानं थोडक्यात तरुणाचा जीवा वाचला असला, तरी सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. अपघातानंतर दुचाकी रस्त्यावर खांबाखाली दबली गेली होती.

हे सुद्धा वाचा

उपचार सुरु

जखमी तरुणाला तातडीनं स्थानिकांच्या मदतीने तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तुंगा रुग्णालयात या तरुणावर वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखारी उपचार केले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातही दोघा तरुणांच्या चालत्या बाईकवर झाड कोसळलं होतं. या दुर्घटनेत दोघाही तरुणांचा जीव गेला होता. ही घटना ताजी असतानाच आता पालघरमध्ये घडलेल्या घटनेमुळे मृत्यू कधीही, कुठेही आणि कसाही गाठू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव झालीये. सुदैवानं मृत्यूला चकवा देत दुचाकीस्वार तरुण या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलाय.