कल्याण (ठाणे) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने पकडलं आहे. या आरोपीने शालेय विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी लागणारं सॉफ्टवेअर बनवून देतो असं सांगत आमदाराचे चिरंजीव प्रणव गायकवाड यांच्याकडून 40 लाख रुपये घेतले होते. अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं आहे. या गुन्ह्यात आरोपीसोबत आणखी कुणी होतं का? याचाही तपास सध्या कल्याण पूर्वेचे कोळसेवाडी पोलीस करत आहेत.
चोरटे हे कुणालाही सोडत नाहीत. एका भामट्याने तर कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची फसवणूक केली आहे. आमदारांच्या मुलाचे नाव प्रणव गायकवाड असं आहे. त्याची स्वत:ची एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. प्रणवची कंपनी शिक्षणासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची निर्मिती करत होती. या दरम्यान त्याची ओळख आशिषकुमार चौधरी नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने प्रणवच्या सॉफ्टवेअर कंपनीत शिक्षणाकरीता सॉफ्टवेअर तयार करुन देण्याच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक केल्याती माहिती उघड झाली आहे. संबंधित प्रकार हा 2018 ते 2020 या कालावधी घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांची सॉफ्टवेअर कंपनी आहे. 2018 साली त्यांच्या विभागात राहणाऱ्या एका तरुणाने गुगलमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला, अशी माहिती समोर आली होती. ही माहिती मिळताच आमदार गायकवाड यांनी आशिष चौधरी या तरुणाचा सत्कार केला. आमदारांनी मुलगा प्रणव गायकवाड याच्या सॉफ्टवेअर कंपनीसाठी शिक्षणाकरीता लागणारे सॉफ्टवेअर तयार करण्याची जबाबदारी आशिष चौधरी याला दिली.
आशिष याने सांगितले होते की, या सॉफ्टवेअरचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. त्याने दोन वर्षात तयार केले सॉफ्टवेअर काही विद्यापीठे आणि कॉलेज घेत आहेत असं भासविले. मात्र असे काही नव्हते. आशिष याने फेक आयडी आणि अॅग्रीमेंटचे कागद तयार केले होते. थोड्याच दिवसात आशिष हा पसार झाला.
आमदारांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आशिषचा शोध सुरु केला आहे. लवकरात लवकर आशिषला अटक करण्यात यावी. त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार गायकवाड यांनी केली आहे. तसेच आरोपीच्या सर्व डिग्री फेक आहेत, असेही त्यांनी सांगितले. आशिषच्या अटकेनंतर त्याने किती लोकांची फसवणू केली आहे हे उघड होणार आहे.
हेही वाचा : मायलेकीच्या नात्याला काळीमा, दहावीत 92 टक्के मिळवणाऱ्या मुलीकडून आईची गळा आवळून हत्या, हादरवणारी घटना