व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक व्हिडिओ आला, ओपन करुन पाहिला तर पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमिनच सरकली

| Updated on: Jan 06, 2023 | 5:57 PM

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला आरोपी एका नो पॉलिटिकल मॅसेज या व्हॉट्सग्रुपशी जोडलेला आहे. या ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शेअर केले जातात. या ग्रुपमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत.

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक व्हिडिओ आला, ओपन करुन पाहिला तर पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमिनच सरकली
आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अभिजीत परब असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी स्वतः त्या महिलेसोबत दिसत आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला आरोपी एका नो पॉलिटिकल मॅसेज या व्हॉट्सग्रुपशी जोडलेला आहे. या ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शेअर केले जातात. या ग्रुपमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत.

आरोपीने व्हॉट्सअप ग्रुपवर महिला आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला

परब याने 9 डिसेंबर रोजी या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या आणि एका महिलेचा एक व्हिडिओ शेअर केला. याच ग्रुपवर महिलेचा पती आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीही आहे. त्याने हा व्हिडिओ ओपन करुन पाहिला असता त्याच्या पायाखालची जमिनच सरकली.

हे सुद्धा वाचा

व्हिडिओतील महिला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी

व्हिडिओमध्ये कॉन्स्टेबल परबसोबत दिसणारी महिली दुसरी तिसरी कुणी नसून त्याची पत्नीच होती. यानंतर त्याने पत्नीलाही याबाबत जाब विचारला. तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ शेअर करत बदनामी केल्याप्रकरणी परब विरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले.

मात्र पत्नी तक्रार दाखल करण्यास तयार नसल्याने कर्मचाऱ्याने पत्नीच्या नातेवाईकांना बोलावून तिला सातारा येथे तिच्या माहेरी पाठवले. त्यानंतर कॉन्स्टेबल परब, त्याची पत्नी आणि व्हिडिओ ज्या नंबरवरुन शेअर झाला त्या नंबरविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. याप्रकरणी कलम 500 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या पोलीस कर्मचाऱ्याने परब विरोधात मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी परबविरोधात विभागीय चौकशी सुरु करण्यात आली असून, चौकशी संपपर्यंत त्याला निलंबित करण्यात आले आहे.