मुंबई : पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा आणि कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) या दोघांना मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत कोठडी दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना काल अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेनं अटक केली आहे.
#UPDATE | Mumbai: Actress Shilpa Shetty’s husband & businessman Raj Kundra and one Ryan Tharp sent to Police Custody till 23rd July.
— ANI (@ANI) July 20, 2021
यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या दरम्यान पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.
राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे (Ryan Thorope) यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.
राज कुंद्रा यांनी रायनवर अश्लील व्हिडीओ लिंकची तांत्रिक बाब सोपवली होती. हे अश्लील चित्रपटांचे रॅकेट मुंबई ते लंडन कसे चालते, याविषयी रायनला सर्व माहिती होती.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज कुंद्राने या अश्लील चित्रपट बनवण्याच्या उद्योगात सुमारे 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली होती. तसेच, या व्हिडीओंचे शूटिंग भारतात करण्यात आले आणि त्यानंतर वी-ट्रान्सफर मार्गे यूकेला हस्तांतरित केले गेले.
संबंधित बातम्या