मुंबई : रेशमी शुक्ला (Reshma Shukla) यांच्याकडून करण्यात आलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोन टॅपिंग (Phone Tapping) प्रकरणात कुलाबा पोलिसांनी खडसेंना समन्स बजावला आहे. कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. एकनाथ खडसे उद्या कुलाबा पोलीस ठाण्यात जवाबासाठी 11 वाजता हजर राहणार आहेत. खडसेंनी tv9 ला माहिती दिली आहे.
रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Rashmi Shukla summons Eknath Khadse in phone tapping case)
Maharashtra | Mumbai Police asks NCP leader Eknath Khadse to appear before it tomorrow to record his statement in the Rashmi Shukla phone tapping case
— ANI (@ANI) April 6, 2022
इतर बातम्या
Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना