मुंबईतून चोरलेले मोबाईल बांग्लादेश, नेपाळमध्ये विकायचे; पोलिसांनी ‘असा’ केला रॅकेटचा पर्दाफाश

| Updated on: Sep 19, 2022 | 10:33 PM

आरोपी आगरतळा येथे ऑर्डर कलेक्ट करायचे आणि जंगल परिसरातून भारत-बांगलादेश सीमेवरून ते पार करायचे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

मुंबईतून चोरलेले मोबाईल बांग्लादेश, नेपाळमध्ये विकायचे; पोलिसांनी असा केला रॅकेटचा पर्दाफाश
नशेंडीकडून दाम्पत्याला मारहाण
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मुंबईतून मोबाईल चोरुन बांग्लादेश आणि नेपाळमध्ये विकणाऱ्या रॅकेट (Racket)चा मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे. ऑगस्ट अखेरीपर्यंत या कारवाईत 800 मोबाईल जप्त (Mobile Seized) करण्यात आले आहेत. तर 21 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. भारत आणि बांग्लादेश सीमेवरील शहरातील कुरिअर कंपन्या आणि गावकरी यांचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे. चोरी केलेले महागडे फोन नेपाळ आणि बांग्लादेशमध्ये तस्करी केले जात होते. तर जुने फोन देशात विकत असत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून या रॅकेटचा पर्दाफाश

जून 2022 मध्ये, मुंबई गुन्हे शाखेत कार्यरत कॉन्स्टेबल संभाजी कोळेकर यांना शहरातील एक रहिवासी हरवलेला किंवा चोरीला गेलेला सेलफोन खरेदी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर, हे ऑपरेशन कसे चालते याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली.

या वर्षाच्या सुरुवातीला, 15 जुलैपर्यंत, टीमने किमान 490 स्मार्टफोन जप्त करण्यात आणि दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तथापि, पुढील महिन्यापर्यंत, टीमने 600 हून अधिक मोबाईल जप्त करत या रॅकेटशी संबंधित 12 लोकांना अटक केली.

हे सुद्धा वाचा

हे सर्व फोन बसमधून चोरीला गेलेले किंवा दुचाकीवरून आलेल्या गुन्हेगारांनी हिसकावलेले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

‘असे’ चालायचे रॅकेट

ऑगस्टमध्ये अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांपैकी एक सीमेजवळ असलेल्या त्रिपुरा येथील एक ग्रामस्थ होता. या आरोपीने चोरीचे फोन बांग्लादेशात कसे तस्करी करण्यात आले, याची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा मुंबईतून हे मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्याचे फोटो आणि तपशील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर अपलोड केले जातात, ज्यात बांग्लादेश आणि नेपाळमधील लोकही आहेत. त्यानंतर, निवडलेले फोन बॉक्समध्ये पॅक करून बांग्लादेशला पाठवले जातात.

मुख्य आरोपी मदरशातील माजी शिक्षक

या रॅकेटमधील प्रमुख आरोपी अश्फाक अब्दुल अझीझ शेख हा एका मदरशात शिक्षक होता. मात्र प्रत्यक्षात तो चोरीचे फोन रिसिव्ह करणारा प्रमुख रिसिव्हर होता. तो त्याच्या कॉन्टॅक्ट नेटवर्कद्वारे नेपाळ आणि बांग्लादेशात चोरीचे मोबाईल पाठवायचा, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

शेखच्या खात्यात लाखोंचे ट्रान्झेक्शन आढळले

शेखची बायको आणि मुलगा नेपाळमध्ये राहतात. तेथे त्याचे बँक खाते आहे. त्या बँक खात्यात नेपाळमधून 8 लाख आणि बांग्लादेशातून 6 लाख जमा करण्यात आल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले.

मुंबईतील स्नॅचर्सककडूनही चोरीचे मोबाईल घ्यायचे

त्याने आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी आर्थिक राजधानीत कार्यरत असलेल्या मोबाईल स्नॅचर्सकडून चोरीचे सेल फोन देखील विकत घ्यायचे. हे फोन बॉक्समध्ये पॅक करुन नंतर दक्षिण मुंबईस्थित कुरिअर कंपनीकडे पाठवले जातात, ज्याचा पत्ता आगरतळा, त्रिपुरा आहे.

मुंबईतून पाठवलेले कुरियर आगरतळामार्गे बांग्लादेशात जायचे

आरोपी आगरतळा येथे ऑर्डर कलेक्ट करायचे आणि जंगल परिसरातून भारत-बांगलादेश सीमेवरून ते पार करायचे, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले. हे चोरीचे फोन कलेक्ट करून बांग्लादेशात विकणाऱ्या तीन जणांची ओळख पटली आहे.

देशाबाहेर फोन गेला की आयएमईआय नंबर ट्रेस होत नाही

हे चोरीचे सेलफोन भारताबाहेर विकले जाण्याचे कारण म्हणजे एकदा मोबाईल देशाबाहेर गेला की आरोपींना IMEI क्रमांक मिटवण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. एकदा फोन दुसर्‍या देशात गेला की, IMEI नंबरचा एजन्सीसाठी फारसा उपयोग होत नाही, असे पोलिसांनी सांगितले.