नवी मुंबईत चोरट्याने 7 दुकानं फोडली, इंम्पोर्टेड टी-शर्टसह लॅपटॉप चोरले, घटना CCTV मध्ये कैद

| Updated on: Jul 11, 2021 | 12:13 PM

घरफोड्या करणाऱ्या चोरट्याने घणसोली, सेक्टर 15 भागातील सात दुकानांमध्ये चोरी करुन लॅपटॉपसह कपडे आणि इतर साहित्य चोरुन नेल्याचे उघडकीस आलं आहे.

नवी मुंबईत चोरट्याने 7 दुकानं फोडली, इंम्पोर्टेड टी-शर्टसह लॅपटॉप चोरले, घटना CCTV मध्ये कैद
नवी मुंबईत चोरट्याने 7 दुकाने फोडली
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत अनलॉक झाल्यावर आता घरफोडी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. घरफोड्या करणाऱ्या चोरट्याने घणसोली, सेक्टर 15 भागातील सात दुकानांमध्ये चोरी करुन लॅपटॉपसह कपडे आणि इतर साहित्य चोरुन नेल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी रबाले पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Thieves Theft 7 shops in Navi Mumbai, steal laptops with imported T-shirts, Theft captured in CCTV)

चोरट्याने 7 दुकानं फोडली

7 जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घणसोली, सेक्टर 15 मधील ग्रीन पार्क सोसायटी मधील मिनीमी स्टोअर्स, सुविधा इंटेरियर कंपनीचे कार्यालय त्याचप्रमाणे आजुबाजूच्या इतर पाच दुकानांचे टाळे तोडून त्यातील ऐवज चोरुन नेल्याचं उघडकीस आलं आहे. ही सगळी चोरीची घटना दुकानात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.

इंम्पोर्टेड टी-शर्टसह लॅपटॉप चोरले

सदर चोरट्याने मिनिमी स्टोअर्स मधील इंम्पोर्टेड टी-शर्टसह विविध प्रकारचे कपडे तसेच बाजुच्या सुविधा इंटेरियर ट्रॅकी या कार्यालयातून लॅपटॉप चोरल्याचे आढळून आले. तसेच चोरट्याने आजुबाजूच्या इतर पाच ते सहा दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचं व्हिडीओमधून दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे .

आरोपीच्या शोधासाठी पथक

पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त विनायक वस्त, रबाले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश गावडे यांनी पथक तयार करून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या शोध सुरु केला आहे.

(Thieves Theft 7 shops in Navi Mumbai, steal laptops with imported T-shirts, Theft captured in CCTV)

हे ही वाचा :

CSR फंडाचे आमिष दाखवून गावकऱ्यांची फसवणूक, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा काही गुन्हेगारांना ‘मौका’ तर काहींवर ‘मोक्का’, पाहा नेमकं प्रकरण काय?