मुंबई : आपल्या घरात मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर काही तृतीयपंथी घरी येतात. ते गाणी गाऊन बाळाला आशीर्वाद देतात. यावेळी ते कुटुंबियांकडून काही रुपये दक्षिणा आणि साडी घेऊन जातात. ही एक जुनी परंपरा आहे, असं आपण मानतो. मात्र, याच पंरपरेआड लपून दोन तृतीयपंथीयांनी दक्षिणा दिली नाही म्हणून अवघ्या तीन महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची संतापजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तृतीयपंथीयांना अटक केली आहे (transgender killed baby child after her parents not given money to him).
कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत ही थक्क करणारी घटना घडली आहे. पैसे दिले नाहीत म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जिवंत बाळाला खाडीत पुरून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (9 जुलै) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि त्याचा साथीदार सोनू काळे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत (transgender killed baby child after her parents not given money to him).
सचिन चितकोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत कफ परेडच्या आंबेडकरनगर या झोपडपट्टीत राहतात. आई, वडील, पत्नी, भाऊ आणि मुलं असा त्यांचा परिवार. सचिन यांना तीन महिन्यांपूर्वी आर्या ही मुलगी झाली. त्यामुळे घरात अत्यंत आनंदाचे वातावरण होते. सचिन यांच्या घरात बाळ जन्माला आल्याची माहिती परिसरातील तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले याला समजली. तो सचिन यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी घरी पोहोचला.
कन्नूने सचिन यांच्या कुटुंबियांकडून एक साडी, नारळ आणि 1100 रुपयांची मागणी केली. पण सध्या लॉकडाऊन असल्याने घरात पैशांची चणचण आहे. त्यामुळे दिवाळीत बक्षीस देऊ, असं कुटुंबियांनी कन्नूला सांगितलं. याच गोष्टीचा राग मनात धरुन कन्नू घराबाहेर पडला.
सध्या पाऊस नाही आणि गरमी वाढलेली आहे. मुलीला गरम होऊ नये म्हणून कुटुंबीय घराचा दरवाजा उघडा ठेवून पडदा ओडून झोपतात. याची माहिती कन्नूला होती. आणि याच संधीचा फायदा घेऊन मध्यरात्री कन्नूने घरात घुसून आर्यांचं अपरहण केले. विशेष बाब म्हणजे यात त्याचा साथीदार सोनूने त्याला मदत केली. मुलीला उचलून नेल्यानंतर दोघांनी आर्याला कफ परेडच्या खाडीत जिवंत पुरून पळ काढला.
मध्यरात्री संबंधित प्रकार घडला. आर्याच्या कुटुंबियांना याबाबत काहीच समजलं नाही. सर्वजण झोपले होते. रात्री उशिरा घरात एक मांजर आली. तिने घरातील एक प्लेट पाडली आणि मुलीची आई ज्योत्सना जागी झाली. यावेळी मुलगी आर्या शेजारी नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी आर्याची शोधाशोध सुरु केली. याशिवाय कन्नूवरही संशय आल्याने त्यांनी त्याचाही शोध सुरु केला. कुटुंबियांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनीदेखील शोध सुरु केला.
दुसरीकडे कन्नू स्वत:हून कफ परेड पोलीस ठाण्यात हजर राहिली. पोलीस तपासात तिने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा सहकारी सोनूलाही शोधून काढले. बक्षीस म्हणून पैसे न दिल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याची कबूली कन्नूने पोलिसांना दिली. दोघांना कफ परेड पोलिसांनी अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
संबंधित बातम्या :
VIDEO | आधी पोलिसांना म्हणाला तुला मधून चिरतो, पोलीस स्टेशनात नेताच ढसाढसा रडत माफी
संतापजनक ! नवी मुंबईत सात वर्षाच्या चिमुकलीवर घराशेजारच्या नराधमाकडून बलात्कार