विरार : रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या (Virar Suicide News) घटनेनं विरार हादरलंय. डोक्यात गोळी झाडून घेत एका रेल्वे कर्मचाऱ्यानं (Railway employee Suicide) आत्महत्या केली. अंधेरीत इंजिनिअर म्हणून हा रेल्वे कर्मचारी कार्यरत होता. राहत्या घरी या रेल्वे कर्मचाऱ्यानं डोक्यात गोळी झाडून घेत जीव दिलाय. नेमकी या रेल्वे कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचं कारण काय होतं? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. शनिवारी मध्यरात्री आत्महत्येची ही घटना घडली. विरार (Virar Crime News) पोलिसांनी आत्महत्या केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास केला जातोय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
नितीश चौरसिया असं आत्महत्या करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते 38 वर्षांचे होते. विरार पश्चिमेच्या राम निवास बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर ते राहत होते. डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी जीव दिलाय. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौरसिया यांच्या निवासस्थानी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कारवाई केली आहे.
दरम्यान, आत्महत्या केलेल्या नितीश चौरसिया यांचा भाचा राजेंद्र यानं या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. आत्यानं सांगितल्यानंतर आपण लगेचच तिच्या घरी गेला. त्यावेळी नितीश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं आधी लक्षात आलं नाही. आम्ही त्यांना लगेचच रुग्णालयात घेऊन गेलो. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना कोणत्या प्रकारचा ताण होता का? याची माहिती नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय नितीश हे काही वैद्यकीय गोळ्यांचं सेवनही करत होते, अशीही माहिती राजेंद्र चौरसिया यांनी दिली आहे.
नितीश यांनी आत्महत्या का केला? याचं कारण स्पष्ट झालं नसून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. नितीश यांचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यता आलाय. त्यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टची विरार पोलिसांना प्रतिक्षा आहे. सध्या पोलीस या प्रकरणी संबंधितांची चौकशी करत आहेत.