Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, अखेर पोलिसांनी त्याला केली अटक

| Updated on: Feb 09, 2024 | 7:26 PM

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत दिवसाढवळ्या हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसभाईनेही आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड, अखेर पोलिसांनी त्याला केली अटक
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर प्रकरणात कारवाईला सुरुवात, पोलिसांनी 'त्या' दोघांना ठोकल्या बेड्या
Follow us on

मुंबई : मुंबईतील दहिसरमध्ये झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणावरून एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. तसेच हल्लेखोर मॉरिसभाईनेही स्वत:च्या डोक्यावर गोळी झाडत आत्महत्या केली. फेसबुक लाईव्ह करून हा प्रकार घडल्याने धक्का बसला आहे. तसेच अनेकांना दोघंही गेल्याने प्रकरण संपलं असंच वाटत होतं.त्यामुळे या प्रकरणातील धागेदोरे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. आता पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र फिरवत कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणात एकाला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलं? याचा सुगावा लागण्यास मदत होणार आहे. मॉरिस नोरोन्हाने बॉडीगार्डच्या बंदुकीने अभिषेक घोसाळकर यांची हत्या केली होती. मॉरिसच्या कुटुंबियानीही या प्रकरणी पोलिसात जबाब नोंदवला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस यांच्यात काही कारणावरून वाद होता. मॉरिसच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून ही खदखद होती. त्यातूनच हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बंदूक बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याची होती. त्यामुळे त्याच्यावर बंदूक हाताळण्यात हलगर्जी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांची चौकशी केली जात आहे. घटनेपूर्वी मॉरिस कोणाला भेटला होता याचाही शोध सुरु आहे. दुसरीकडे, अमरेंद्रची कसून चौकशी सुरु असून या प्रकरणात आणखी कोण कोण आहेत लवकरच पुढे येईल. अमरेंद्रला शनिवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

मॉरिसने कसा रचला हत्येचा प्लान?

मॉरिसने तुरुंगातून आल्यानंतर अभिषेक घोसाळकराचा विश्वास संपादन करण्याचं प्लानिंग केलं होतं. ठिकठिकाणी अभिषेक घोसाळकर याचे बॅनर लावून विश्वास पक्का केला. महिनाभर असं केल्यानंतर 8 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता अभिषेक घोसाळकर आयसी कॉलनीतील ऑफिसमध्ये आले होते. या ऑफिसपासून 100 मीटर दूर मॉरिसचं ऑफिस आहे. मॉरिसने अभिषेकला फोन केला आणि ऑफिसमध्ये बोलवलं. तसेच फेसबुक लाईव्ह करून आपसातील वाद संपवून नव्याने काम करण्याची घोषणा केली. पण सिक्युरिटी गार्डने बंदुकीने घोसाळकरवर गोळ्या झाडल्या.