‘एक मोठे टेंडर मिळाल्यावर आपण लग्न करू, तु आता…’; मुंबईतील तरूणीसोबत धक्कादायक प्रकार

| Updated on: Aug 03, 2024 | 5:18 PM

मुंबईतील कल्याण येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षित तरूणीला एकाने चांगलाच गंडा घातलाय, शादी डॉट कॉमवरील ओळख तिला चांगलीच महागात पडली, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

एक मोठे टेंडर मिळाल्यावर आपण लग्न करू, तु आता...; मुंबईतील तरूणीसोबत धक्कादायक प्रकार
Follow us on

लग्नाचे खोटे प्रोफाइल शादी डॉट कॉम साईटवर बनवून तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सतीश पाटील असून सराईत गुन्हेगार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल एक महिना आरोपीचा शोध घेत होते. अखेर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी नाशिकमध्ये सापळा लावून अटक केलीये. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.

नेमकं काय आहे प्रकरण?

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील एका हायप्रोफाईल सोसायटीत एक तरुणी राहते. ती एका खाजगी कंपनीत काम करते. काही महिन्यापूर्वी शादी डॉट कॉम ॲपद्वारे या तरुणीची सतीश पाटील नावाच्या तरुणासोबत ओळख झाली. दोघेही ऑनलाईन एकमेकांशी संपर्कात होते. त्यानंतर सतीशने त्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि आणखी जवळीक निर्माण केली. मुलीला विश्वासात घेतल्यानंतर मोठ्या कंपनीत कामाला असून एक मोठा टेंडर मिळणार असून ते मिळाल्यानंतर आपण लग्न करू असे आमिष दाखवत तिच्या कडून साठ लाख रुपयांची रक्कम घेतली. लग्न होणारी या आशेने या तरुणीने बँकेतून कर्ज देखील काढले. कर्जाच्या हफ्त्याची रक्कमच भरण्यासाठी तरुणीने त्याच्याकडे तगादा लावला. मात्र त्याने कारणे देत पैसे भरण्यास टाळाटाळ केली.

अखेर तरुणीच्या लक्षात आले की सतीश तिची फसवणूक करत आहे. या नंतर तिने कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच पोलिसांनी त्या बनवट प्रोफाइलचा तपास करत थेट नाशिक मधून आरोपी सतीश याला बेड्या ठोकल्या असून सतीश पाटील याने अशा प्रकारे आणखी काही तरूणींसह महिलांची फसवणूक तर केली नाही नाही ना? याबाबतचा तपास  पोलीस करत आहेत.

दरम्यान, सोशल मीडिया हाताळताना सर्वांनी काळजी घ्यायला हवी. कारण आता साईबर  क्राईमपेक्षा अशी विश्वासात घेत फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.  त्यामुळे प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यायला हवी.