भरपावसात मुलांसह ती घरी निघाली, पण लाखोंचे दागिने असलेली बॅग रिक्षातच विसरली… दागिने घेऊन पळालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| Updated on: Dec 08, 2023 | 3:09 PM

तब्बल सहा लाख रुपये किमतीचे 12 तोळ्यांचे दागिने असलेली बॅग चोरून पळ काढणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला कुरार पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शिवप्रसाद यादव (वय 41), आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यावला बेड्या ठोकल्या.

भरपावसात मुलांसह ती घरी निघाली, पण लाखोंचे दागिने असलेली बॅग रिक्षातच विसरली... दागिने घेऊन पळालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us on

मुंबई | 8 डिसेंबर 2023 : तब्बल सहा लाख रुपये किमतीचे 12 तोळ्यांचे दागिने असलेली बॅग चोरून पळ काढणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला कुरार पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शिवप्रसाद यादव (वय 41), आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यावला बेड्या ठोकल्या. ही बॅग शिवप्रसाद याच्या रिक्षा बसलेल्या एका महिला प्रवाशाची होती. मात्र खाली उतरताना ती महिला दागिन्यांनी भरलेली बॅग रिक्षातच विसरली. त्यानंतर यादवने तातडीने रिक्षा घेऊन पळ काढला. त्या महिलेने कुरार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून १२ तोळ्यांचे सर्व दागिने तसेच त्याची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली,

नेमकं काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर ही घटना घडली. सोनल भोसले असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. 11 नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सोनल यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून रिक्षा पकडली. त्यांना मालाड पूर्वेला असलेल्या लक्ष्मी नगर येथे जायचं होतं. त्या दिवशी संध्याकाळी खूप पाऊस कोसळत होता. आणि लक्ष्मी यांच्यासोबत दोन लहान मुलंही होती. रिक्षा इच्छित स्थळू पोहोचल्यानंतर सोनल या त्यांच्या दोन लहान मुलांसह खाली उतरली, मात्र त्यांच्या गोंधळात ती दागिन्यांची बॅग रिक्षातच विसरली.

ती खाली उतरताच रिक्षाचालक यादवने त्याचे वाहन पटकन सुरू केलं आणि तो वाऱ्याच्या वेगाने पुढे निघून गेला. तेव्हा सोनला यांना आपण लाखो रुपयांचे दागिने असलेली ती बॅग रिक्षातच विसरल्याचे लक्षात आले आणि त्या हादरल्या. मात्र त्यांनी ऑटोरिक्षाचा नंबरही पाहिला नव्हता.

ऑटोचालक, प्रामाणिकपणे, स्वत:हून दागिने आणून देईल, या आशेने सोन यांनी त्याची वाट पाहिली, पण तो काही आला नाही. अखेर सोनल यांनी कुरार पोलिस स्टेशन गाठून घडलेला सगळा प्रकार सांगात चोरीची तक्रार नोंदवली,

असा लावला चोराचा शोध

सोनल यांच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. तांत्रिक सहाय्य आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दागिने लांबवणाऱ्या त्या ऑटोरिक्षा चालकाला कांदिवली रेल्वे स्थानकावर पकडले. पोलिसांना त्याच्या ताब्यात असलेले 2.70 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र,2.40 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 90 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, 500 रुपये किमतीचे कानातले आणि 1000 रुपये किमतीची साडी हे सर्व सामान जप्त केले. तसेच त्याची रिक्षाही पोलिसांनी जप्त केली.

ऑटोरिक्षाचालक शिवप्रसाद यादव हा मूळचा बिहार येथील असून सध्या कांदिवली येथे राहतो. त्याचा हे दागिने चोरण्याच डा होता, नाहीतर दोन दिवसांत त्याने मूळ मालकिणीला ते दागिने परत केले असते, असे पोलिसांनी सांगितलं.