छोट्या माशामुळे मोठ्ठा मासा लागला गळाला… लाखोंचे मोबाईल लुटणाऱ्या दुकलीला कशा ठोकल्या बेड्या ?

| Updated on: Oct 07, 2023 | 4:57 PM

मोबाईल चोरीप्रकरणी दुकलीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल 47 मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांची एकूण किंमत साडेसहा लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समजते. याप्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे.

छोट्या माशामुळे मोठ्ठा मासा लागला गळाला... लाखोंचे मोबाईल लुटणाऱ्या दुकलीला कशा ठोकल्या बेड्या ?
Follow us on

गोविंद ठाकुर , टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 7 ऑक्टोबर 2023 : शहरात छोट्या-मोठ्या चोऱ्या, गुन्हे रोजच घडत असतात. पोलिसांनी कठोर कारवाई करून देखील चोरीच्या (theft case) घटनांना आळा काही बसत नाही. मुंबईत सध्या दररोज मोबाईल चोरीच्या घटनाही घडच आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करताना किंवा गर्दीच्या ठिकाणी चोरटे हातचलाखीने मोबाईल लांबवत ( mobile theft) असतात. आजकाल रोजच्या आयुष्यातील बहुतांश काम, मोबाईद्वालरेच केली जातात. महत्वाचे पासवर्ड, नोंदी या सगळ्या गोष्टीही आपल्या मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे मोबाईल चोरीला गेला तर मोठे आर्थिक नुकसान तर होतेच, पण या इतर महत्वाच्या गोष्टी, पासवर्ड ब्लॉक करण्यात, फोन चोरीची तक्रार नोंदवणं यात अजूनच वेळ जातो आणि मनस्ताप होतो तो वेगळाच.

दरम्यान मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोबाईल चोरीचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर मालवणी पोलिसांनी त्या व्हिडीओचे विश्लेषण करून खबऱ्यांना कामाला लावत मोबाईल चोरांची माहिती गोळा केली.

एकामुळे काढला दुसऱ्या चोराचा माग

खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी सब्बीर स्टीव्हन उर्फ लॉरेन्स चित्रे याला अटक केली. त्याने आत्तापर्यंत अनेक मोबाईल चोरून विकल्याचे तपासात समोर आले. तसेच त्याने दिलेल्या माहितीनुसार, चोरलेले मोबाईल खरेदी करणारा आणखी एक जण इम्तियाज उस्मान शेख उर्फ इम्तियाज बाटला यालाही अटक करण्यात आली. चित्रेच्या माहितीवरून पोलिसांनी दुसऱ्या आरोपीचा माग काढत त्यालाही ताब्यात घेतले. बाटला याच्याकडून तब्बल 47 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. या सर्व मोबाईल्सची किंमच अंदाजे 6 लाख 70 हजार रुपये आहे.

लॉरेन्स चित्रे आणि बाटला या दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि हिसकावण्याचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही आरोपी मालवणी येथील रहिवासी आहेत. त्यांनी आणखी कुठे आणि किती मोबाईल चोरून विकले आहेत, याचा तपास मालवणी पोलीस करत आहेत.