Mumbai Crime : तुमचीही फसवणूक झाली नाही ना ? नोकरीचा बहाणा देऊन गंडवणारी टोळी गजाआड; वसई-विरारमध्ये काय घडलंय?

| Updated on: Oct 21, 2023 | 1:37 PM

टोळीतील हे भामटे आधी सुशिक्षित पण बेरोजगार तरूणांना हेरायचे. नंतर नोकरीचं आश्वासन देऊन त्यांना ऑफर लेटरही द्यायचे. मात्र त्यानंतर....

Mumbai Crime : तुमचीही फसवणूक झाली नाही ना ? नोकरीचा बहाणा देऊन गंडवणारी टोळी गजाआड; वसई-विरारमध्ये काय घडलंय?
Follow us on

नालासोपारा | 21 ऑक्टोबर 2023 : सध्या शहरात फसवणूकीचे (fraud) प्रमाण बरेच वाढले. ऑनलाइन जॉब्स, पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आमिष दाखवून केलेली फसवणूक , अशा अनेक प्रकारांना सध्या लोकं बळी पडत आहेत. मेहनतीची कमाई झटक्यात गमावल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसतो. नोकरीसाठी सध्या अनेक तरूण मुलं मुली भटकत असतात. चांगले शिक्षण घेऊनही सगळ्यांनाच जॉब मिळतो, असे नाही. बऱ्याच लोकांना नोकरीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशाच सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरूणांना हेरून त्यांची फसवणूक (job fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एका टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे.

फसवणूक करणारे टोळीतील हे भामटे वसई विरार महापालिकेच्या अधिकृत चिन्हाचा वापर करून, नोकरीचे बनावट ऑफर लेटर देत होते. अखेर नालासोपारा पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. विजय जाधव, सुरज जाधव, महेश जाधव अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी एकूण १० तरूणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

बेरोजगार तरूणांना हेरून साधायचे कार्यभाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय, सूरज आणि महेश या तिघांची एक टोळी होती. ते शहरातील व आसपासच्या परिसरातील सुशिक्षित पण बेरोजगार असलेल्या तरूणांना हेरायचे. त्यानंतर त्यांना वसई विरार महापालिकेत नोकरी लावतो असे आश्वासन द्यायचे. त्यानंतर ते महापालिकेचे अधिकृत चिन्ह आणि पालघर विशेष अधिकारी यांचा राजमुद्रित गोल शिक्का बनावट दस्तऐवजावर मारून नोकरीचे बोगस किंवा बनावट ऑफर लेटर या तरूणांन द्यायचे आणि त्यांची फसवणूक करायचे.

आत्तापर्यंत एकूण १० तरूणांना अशा प्रकारे फसवण्यात आले. नालासोपारा पूर्व आचोळा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत विजय जाधव, सुरज जाधव, महेश जाधव या तिघांना अटक केली. ते तिघेही नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे समजते.

दरम्यान अशाच पद्ध्तीने आणखी कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी समोर येऊन तक्रार द्यावी असे आवाहन आचोळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी केले.