Mumbai Crime : भयानक ! वासनांध व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केला पण…

| Updated on: Oct 27, 2023 | 1:22 PM

आरोपीने 11 वर्षीय पीडितेला अश्लील व्हिडिओ दाखवल्याची माहिती समोर आली आहे. या संतापजनक घटनेबद्दल समजताच पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली.

Mumbai Crime : भयानक ! वासनांध व्हॅन चालकाचे विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, भेदरलेल्या मुलीने आरडाओरडा केला पण...
Follow us on

मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले असून महिलांविरोधातील अत्याचारातही वाढ होताना दिसत आहे. लहान मुलीही या कचाट्यात सापडल्या असून वासनांध इसमांमुळे लहान मुलीदेखील सुरक्षित नसल्याचे चित्र (crime in mumbai) सध्या दिसत आहे. असेच एक खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. एक अत्यंत चिंताजनक घटना चेंबूर परिसरात घडली आहे. तेथे एका व्हॅन ड्रायव्हरने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

अवघ्या ११ वर्षांच्या च्या मुलीला व्हॅन ड्रायव्हरने अश्लील व्हिडीओ दाखवत तिचा वियभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी त्या वासनांध इसमाला अटक केली आहे. तुषार भालेराव असे आरोपीचे नाव असून, त्याने पीडितेला त्याच्या मोबाइल फोनवर अत्याचाराचे व्हिडिओ दाखवले. विद्यार्थिनीच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केल्ायनंतर हा सर्व प्राकर उघडकीस आला. त्यानंतर टिळकनगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी चालकाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरच्या टिळकनगर परिसरात 19 ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. पीडित मुलगी ही तेथील स्थानिक शाळेत शिकते. घटनेच्या दिवशी पीडित विद्यार्थिनी शाळेतून घरी जाताना व्हॅनमध्ये एकटीच होती. याच परिस्थितीचा फायदा घएऊन आरोपी व्हॅन चालकाने त्याची स्कूल व्हॅन
लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात पार्क केली. आणि त्याच्याकडील मोबाईलमध्ये असलेला अश्लील व्हिडीओ त्या अल्पवयीन मुलीला दाखवून तिचा विनयभंग केला.

आईने विचारपूस केल्यावर कथन केला प्रकार

मात्र या संपूर्ण घटनेमुळे ती मुलगी प्रचंड घाबरली, भेदरली देखील. तिने कशीबशी हिंमत गोळा करून मदतीसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी ड्रायव्हरने तिला धमकावत तोंड बंद ठेवण्यास सांगितलं आणि नंतर तिला घराजवळ सोडून तो निघून गेला. घाबरलेल्या अवस्थेत घरी आलेल्या पीडित विद्यार्थिनीने बराच काळ तोंड बंद ठेवलं. पण तिची परिस्थिती पाहून, आईने प्रेमाने विचारपूस केल्यावर मात्र ती स्वत:ला रोखू शकलीच नाही. रडत-रडत तिने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

या संतापजनक घटनेबद्दल समजताच पीडित मुलीच्या आईने बुधवारी टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी व्हॅनचालक तुषार भालेराव याला ताब्यात घेतले.आम्ही आरोपीला अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी नमूद केले.