मुंबई : नाशिकच्या गंगापुर रोड पोलिस ठाण्यात एका अज्ञात महिलेवर तीन महिन्याच्या चिमूकलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भूषण रोकडे हे त्यांच्या आईसह पत्नी आणि तीन महिन्याच्या मुलीसह राहतात. त्यामध्ये भूषण हे एका कंपनीत मॅनेजर आहे. ते ड्युटीवर गेले असतांना आई आणि पत्नीसह तीन महिन्याची चिमुकली घरात होती. त्यानंतर आई देखील दूध आणण्यासाठी गेली असतांना घरात एक पंजाबी ड्रेस घालून एक महिला आली आणि तिने महिलेच्या नाकाला गुंगीचे औषध असलेला रुमाल लावला आणि नंतर 3 महिन्याच्या मुलीचा गळा चिरून हत्या केल्याची बाब पोलिसांच्या गुन्ह्यावरुन समोर आली होती.
याच घटनेची दखल राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबत सखोल चौकशीचे आदेश देऊन अहवाल मागविण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेवरुन महिला आयोगाने मोठा संशय व्यक्त केला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटलंय, नाशिक शहरातील गंगापूर रोड धृवनगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तपास अधिकारी व त्यांची यंत्रणा तत्परतेने तपास करत आहेत ,आयोगाकडून तशा सूचना देण्यात आल्या आहेत .पण एकंदर माहिती घेता केवळ मुलगी आहे म्हणून ही हत्या असू शकते आणि अशी जर नीच मानसिकता असेल तर हि अतिशय दुदैवी घटना आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रॉड धृवनगर परिसरात
तीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे,तपास अधिकारी व त्यांची यंत्रणा तत्परतेने तपास करत आहेत ,आयोगाकडून तसा सूचना देण्यात आल्या आहेत .पण एकंदर माहिती घेता केवळ मुलगी 1/2— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 21, 2023
आरोपींचा तपास आणि योग्य ती कडक कारवाई यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल असं रूपाली चाकणकर यांनी म्हंटलं आहे. एकूणच कुटुंबातील व्यक्तीनेच ही हत्या केल्याचा संशय महिला आयोगाला असून त्या दृष्टीने आता पोलिसांच्या तपासात काय येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.