गोविंद ठाकूर, मुंबई : ड्रग्जची तस्करी करणाऱ्या फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यास एमएचबी पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपी मुंबई उपनगरातील बोरिवली आणि परिसरातील लहान मुलांसह शालेय आणि विद्यालयीन मुलांना गांजा, ब्राऊन शुगर, एमडी ड्रग्ज सप्लाय करायचा. रोहित शुक्ला असे अटक करण्यात आलेल्या 25 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 816 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी गेल्या सहा वर्षापासून ड्रग्ज विक्रीचे काम करत आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसेच आरोपीचा अन्य साथीदार आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.
आरोपी झोपडपट्टी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे व्यसन लावायचा. विद्यार्थ्यांना गांजा विक्री करायचा. आरोपीने अनेक शालेय मुलांना ड्रग्जच्या नादी लावले होते. पोलिसांनी अनेक वेळा आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकमा देऊन पसार व्हायचा. बोरीवली एमएचबी पोलिसांसह इतर अनेक पोलीस आरोपीचा शोध घेत होते. मात्र यावेळी एमएचबी पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.