Mumbai Crime : ना सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शीही नाहीच.. फक्त ‘त्याच्या’ मदतीने पोलिसांनी शोधला खुनाचा आरोपी, कोणी केली मदत ?

| Updated on: Oct 13, 2023 | 12:52 PM

इमारतीत किंवा आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही नसल्यामुळे खून कोणा केला हे शोधायचं कसं हा प्रश्न पोलिसांसमोर होता. या केसमध्ये कोणी प्रत्यक्षदर्शीही नव्हता, त्यामुळेच गुंता आणखीन वाढला.

Mumbai Crime : ना सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शीही नाहीच.. फक्त त्याच्या मदतीने पोलिसांनी शोधला खुनाचा आरोपी, कोणी केली मदत ?
Follow us on

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : गुन्हेगार कितीही चलाख असला तरी काही ना काही, अगदी छोटीशी चूक तरी करतोच आणि अखेर पकडला जातो. एका महिलेच्या हत्येप्रकरणातील (crime news) आरोपीला पोलिसांनी अशाच एका छोट्याशा पुराव्यामुळे पकडले. आणि त्या शोधमोहिमेत त्यांची सर्वाधिक साथ दिली ती लिओने…

हो लिओ हा मुंबई पोलिस दलातील श्वान. सीसीटीव्ही, किंवा प्रत्यक्षदर्शी कोणीच नसताना पोलिसांनी लियोच्या मदतीने या गंभीर गुन्ह्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या (accused) आणि त्याचा पळून जाण्याच प्लान फुस्स झाला.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील गोरेगावमध्ये २०१२ साली एका महिलेची तिच्या घरात अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर मारेकरी परत घटनास्थळी आला आणि त्यानेच पोलिसांना या हत्येची माहिती दिली. कोणी त्याच्यावर संशय घेणारच नाही, असा त्याला (अती!)विश्वास होता . पण मुंबई पोलिसांच्या लिओ या श्वाानाने त्याचा सगळा डाव उधळून लावला. अखेर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.

रिपोर्ट नुसार, 14 जानेवारी 2021, मध्ये शेहनाज शेख या 40 वर्षीय महिलेची गोरेगावच्या आरे कॉलनीतील घरात हत्या करण्यात आली. तिच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आला होता. शेख या तेव्हा त्यांच्या तीन मुलींसोबत रहायच्या. मात्र घटनेच्या दिवशी त्या घरात एकट्याच होत्या. त्यांची एक मुलगी घरात परत आल्यानंतर आईची हत्या झाल्याचे तिने पाहिले आणि हादरलीच.

पोलिसांपासून वाचण्यासाठी पोलिसांचीच केली मदत

या हत्येची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस तेथे पोहोचले आणि तो संपूर्ण परिसर सील केला. शेजारी आणि आजूबाजूच्या भागातील लोकांची पोलिसांनी चौकशी केली. तेव्हाच सूरज कुमार मौर्य या शेजाऱ्याकडून त्यांना बरीच माहिती मिळाली. शेख व त्यांच्या कुटुंबाशी आपली चांगली ओळख असल्याचे सूरजने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीचा वापर करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.

सीसीटीव्ही नाही, कापडाचा तुकडाही सापडला, अखेर आला लिओ

घटनास्थळाची बारकाईने तपासणी करताना पोलिसांना तेथे एका पुरूषाच्या ड्रेसचा, निळ्या रंगाचा कपड्याचा तुकडा मिळाला. घरात केवळ शेख आणि त्यांच्या मुलीट रहायच्या . त्यांच्या इमारतीत किंवा आसपास कुठेच सीसीटीव्ही नव्हता, त्यामुळे पोलिसांनी मदतीसाठी अखेर डॉग स्क्वॉडला बोलावण्याचा निर्णय घेतला. लिओ, या त्यांच्या श्वानाला पोलिसांनी ते कापड हुंगायला दिले.

त्यानंतर लिओने संपूर्ण घर हुंगून काढले, सगळ्या बाजू तपासल्या. त्यानंतर त्याने त्याचा हँडलर, कॉन्स्टेबल भाऊ शिंदे यांना घराच्या मागच्या बाजूस नेले. आरोपी इथूनच पळून गेला असावा, असे पोलिसांना वाटले. लिओ तिथून पुढे गेला आणि शेजारच्या एका घराकडे इशारा करून भूंकू लागला. त्या घरात राहणारा इसम बाहेर गेला होता. तो परत आल्यानंतर पोलिसांनी त्याला इतर संशयितांसह ताब्यात घेतले.

ओळख परेड मध्ये लिओने आरोपीला ओळखले

पोलिस स्टेशनमध्ये ओळख परेड साठी लिओला पुन्हा बोलावण्यात आले. थोड्या वेळाने लिओ एका व्यक्तीकडे पाहून सतत भूंकू लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कठोरपणे चौकशी केली असता, अखेर तो कोसळला आणि खून केल्याची कबूली दिली. हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून २५ वर्षांचा सूरज कुमार मौर्य हाच होता. त्यानेच पोलिसांची मदत करण्यात नाटक करत त्यांची दिशाभूल केली होती.

का केली हत्या ?

मौर्यने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याचे व शेख यांचे प्रेमसंबंध होतो. मात्र काही दिवसांनी शेख यांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरूवात केली. मौर्यला ते मान्य नव्हते म्हणूनच त्याने शेख यांना संपवण्याचा निर्णय घेतला. हत्येचा दिवशी शेख यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून सूरज कुमार मौर्य त्यांच्या घरी गेला. तेथे त्यांच्यात बराच वेळ वाद झाला. अखेर मौर्यने एका जड वस्तूने शेख यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांची हत्या केली. मात्र त्यानंतर तो घाबरला आणि पळून-जाण्याचा गडबडीत, त्याच्या अंगावरील कपड्यांचा एक तुकडा तिथेच पडला. अखरे त्याला अटक करण्यात आली.