मुंबई : देशाच्या विविध भागातून बेकायदेशीरपणे सीडीआर (Call Detail Record) आणि एसडीआर (Subscriber Details Record) काढून (Selling CDR And SDR Illegally) अनधिकृतरित्या जास्त किंमतीवर विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण 7 लोकांना देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून अटक केली आहे (Selling CDR And SDR Illegally ).
फोनवर बोलताना शक्य असेल तर गोपनीय माहिती देऊ नका. संवेदनशील काही असेल तर तेही बोलणं टाळा कारण तुमचा सीडीआर डेटा काढला जाऊ शकतो किंवा तुमच्या विरोधिला ही दिला जाऊ शकतो. अशाच प्रकरणामध्ये अनधिकृतरित्या सीडीआर खरेदी-विक्री प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने एकूण 7 लोकांना अटक केली आहे. या टोळीच्या सदस्यांनी बेकायदेशीरपणे सीडीआर मिळवून त्यांना आपल्या ग्राहकांना जास्त किंमतीला विकले असल्याच्या तपासात उघड झाला आहे .
>> 300 हून अधिक कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) जप्त
>> 5 लाखांहून अधिक स्बस्क्रायबर डेटा रेकॉर्ड (एसडीआर) जप्त
>> सीडीआरसाठी कमीत कमी 40 हजार रुपये आणि जास्त जेवढे मिळाले
>> एसडीआरसाठी तब्बल ५ हजार रुपये आकारले जात होते
गुन्हे शाखेच्या अधिकायांना त्यांच्या खबरींच्या माध्यमातून माहिती मिळाली होती की, बेकायदेशीरपणे सीडीआर काढणे आणि त्याची विक्री केली जात आहे. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागातील एका व्यक्तीला डमी ग्राहक म्हणून टोळीच्या सदस्यांकडे पाठविले. त्यांनी प्रथम डिटेक्टिव्ह शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साव यांची भेट घेतली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अनेक पेन ड्राईव्ह, लॅपटॉप सीडीआर आणि एसडीआर मिळाले.
अधिक चौकशी केल्यानंतर हे नेटवर्क केवळ मुंबईतच नव्हे तर देशातील इतर राज्ये आणि शहरांशीही जोडलेले असल्याचे आढळले. ज्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, ओदिशा, मंगळुरु इत्यादींचा समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक झाल्यानंतरच मुख्य आरोपी, गाझियाबाद येथे राहणारा सौरभ साहू, जो फक्त 8 वी पास आहे, त्याच्यापर्यंत गुन्हे शाखेची टीम पोहोचली (Selling CDR And SDR Illegally ).
आतापर्यंतच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, बेकायदेशीरपणे काढल्या गेलेल्या सर्व सीडीआर आणि एसडीआर दिल्ली आणि आसपासच्या शहरातून काढल्या गेल्या आहेत. बेकायदेशीर सीडीआर आणि एसडीआर प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना हे समजले की आरोपी लोकांचे बँक खात्यांचा तपशील ही देत असत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डेबिट, क्रेडिट कार्ड, बुक आणि चेकबुक जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात लवकरच आणखीन काही नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
कुर्ल्यातील ड्रग्ज व्यापाऱ्याला लग्नमंडपातच अटक; एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला ‘सिंगल’च ठेवलंhttps://t.co/hQcfu7VjvM #NCB #Drug
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 10, 2021
Selling CDR And SDR Illegally
संबंधित बातम्या :
8 महिन्याच्या चिमुकलीला विकण्याचा प्रयत्न, विरार पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड
‘अल्लाचा प्रकोप होईल’ अशी भीती दाखवत 15 लाखांची फसवणूक, वसईत 2 भामटे गजाआड