शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवले, औरंगाबादेत मध्यरात्री राडा

| Updated on: Feb 17, 2022 | 7:14 AM

सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने शहारात किंवा खेड्यात अनेक ठिकाणी बॅनर लावल्याचे दिसतात. परंतु त्याची परवानगी घेऊन अनेक ठिकाणी बॅनर लावले जातात. काल झालेल्या प्रकरणात नेमकं काय झालंय हे अद्याप समजू शकलेलं नाही,

शिवप्रेमींचे बॅनर महापालिकेने हटवले, औरंगाबादेत मध्यरात्री राडा
क्रांती चौकात तणाव निर्माण झाला होता.
Follow us on

औरंगाबाद – काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना (police) या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना तिथून पांगवले आहे. घटनास्थळी रात्री अनेक पोलिस उपस्थित होते. तसेच रात्री तिथं बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सध्या औरंगाबादच्या महापालिकेत शिवसेनेची (shivsena) सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दाम खोडसाळपणा केला असल्याचा आरोप बॅनर कार्यकर्त्यांचा आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं वातावरण निवळल्याचं आम्हाला समजतंय. शिवजयंती तोंडावर आल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवजयंती बॅनर लावण्यात येतात. पण महापालिकेने कारवाई केल्याने तिथं चांगलाचं गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.


शिवेसेनेवरती बॅनर काढल्याचा आरोप

सध्या अनेक ठिकाणी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने शहारात किंवा खेड्यात अनेक ठिकाणी बॅनर लावल्याचे दिसतात. परंतु त्याची परवानगी घेऊन अनेक ठिकाणी बॅनर लावले जातात. काल झालेल्या प्रकरणात नेमकं काय झालंय हे अद्याप समजू शकलेलं नाही, कारण औरंगाबादची महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिथं शिवसैनिकांची सत्ता असल्यामुळे त्यांच्यावरती आरोप करण्यात आहे. तसेच शिवजयंतीच्या तोंडावर बॅनर लावून शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येकवेळी साजरी केली जाते. त्यानिमित्ताने प्रत्येक शहरात वेगवेगळ उपक्रम देखील राबिवले जातात. पण काल घडलेल्या घटनेमुळे औरंगाबादमधल्या क्रांती चौकात चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांची देखील बाचाबाची झाली असल्याचे समजतंय. नेमका बॅनर का हटवला किंवा का कारवाई केली ? अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिस आणि शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

रात्री झालेल्या राड्यात अनेकांनी पोलिसांना उर्मट भाषा केली आहे, तर अनेकांनी पोलिसांना जाब विचारला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती अधिक प्रमाणात चिघळली होती. शिवप्रेमीचे क्रांती चौकातले अनेक बॅनर हटवल्याने कार्यकर्ते एकत्रित आले होते. महापालिने रात्रीचं का बॅनर काढले असे देखील शिवप्रेमींनी पोलिसांना विचारले आहे ? बॅनर काढल्याची माहिती अनेकांना समजताच शेकडो कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले होते. शिवसेनेकडून आमचा शिवजयंतीचा कार्यक्रम थांबवण्याचा प्रयत्न देखील सुरू असल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे.

दादा आपले मनस्वी आभार, भाजप नगरसेवकानं अजित पवारांच्या आभाराचे बॅनर्स लावले

VIDEO | मनसेला रामराम, कुख्यात गुंड गजानन मारणेच्या बायकोचा राष्ट्रवादीत प्रवेश

मरुन जाऊ, पण मुलावर सरकारी खर्चानं उपचार करणार नाही, असं म्हणणारे बिहारचे मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर जननायक का ठरले?