शरीराचे तुकडे झाले, तरीही तब्बल 2 महिने तिचं चॅटिंग सुरुच! कसं काय? पॉर्न स्टारची मर्डर मिस्ट्री

| Updated on: Sep 30, 2022 | 11:15 AM

तिच्या शरीराचे तुकडे केले, 27 भाग केलेलं तिच्या शरीराचे तुकडे केलेले अवयव फ्रीजरमध्ये ठेवले आणि त्यादरम्यान करण्यात आलं आणखी एक भयंकर कृत्य

शरीराचे तुकडे झाले, तरीही तब्बल 2 महिने तिचं चॅटिंग सुरुच! कसं काय? पॉर्न स्टारची मर्डर मिस्ट्री
कॅरल माल्टेसी उर्फ एंजी, पॉर्नस्टार
Image Credit source: instagram
Follow us on

कॅरल माल्टेसी उर्फ एंजी (Carol Maltesi) या नावाने पॉर्न इंडर्स्टीत प्रसिद्ध असलेल्या एका तरुणीचा खून झाला. तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. शरीराचे तुकडे करुन तिचा मृतदेह (Dead Body) बॅगेत कोंबण्यात आला होता. हत्येनंतरही एंजी चॅटिंग करत होती. हे कसं शक्य आहे, यावरुनही एंजीची मॅर्डर मिस्ट्री (Murder Mystery) उलगडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला. त्यातून खळबळजनक खुलासा समोर आलाय.

हत्येनंतर तब्बल दोन महिने एंजीच्या फोनवरुन चॅटिंग सुरु होतं. 19 मार्चला जेव्हा एंजीचा मृतदेह बँगेत तुकडे-तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला, त्यानंतर ही बाब समोर आली. 2 महिने आधीच तिची हत्या झाली होती. पण ही बाब समोर येण्याआधी पोलीस तपासातून एकापेक्षा एक थरारक गोष्टींचा उलगडा झाला.

एंजी ही एक पॉर्नस्टार तरुणी. कुटुंब गरीब. म्हणून पॉर्न इंडस्ट्रीत काम करायला परिस्थितीने एंजीला भाग पाडलं. पॉर्न इंडस्ट्रीने तिला बक्कळ पैसा कमावून दिला. नंतर ती कुटुंबापासून वेगळी राहू लागली. मूळच्या इटली देशातील ब्रेसल्स शहरातील कॅरल माल्टेसी उर्फ एंजीचं आयुष्यच पॉर्न इंडस्ट्रीने बदलून टाकलं होतं.

हे सुद्धा वाचा

कोरोनाने सगळ्या क्षेत्रांना फटका दिला. पण पॉर्न इंडस्ट्री त्याला अपवाद होती. इटलीतील प्रसिद्ध पॉर्न स्टार म्हणून एंजी अल्पावधित चर्चेत आली. ती लक्झरी आयुष्य जगू लागली होती. शॉपिंग मॉलमधली नोकरी सुटल्यानंतर पैशांसाठी तिने पॉर्न फिल्ममध्ये काम करायला सुरुवात केली होती. दोन वर्षांच्या कामात तिची आर्थिक भरभराट झाली.

या इंडस्ट्रीत तिचे संबंध एकापेक्षा एक डेंजर लोकांशी आले होते. लोक तिचे व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड होण्यासाठी प्रतीक्षा करु लागले होते, इतकी प्रसिद्धी कॅरलला मिळाली होती. या दरम्यानच, एका पूल पार्टीसाठी एंजीला विचारणं आलं. तो महिना होता मार्च 2022.

मार्च महिन्यात पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी आयोजक एंजीशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण ती फोन उचलत नव्हती. खरंतर त्याआधी याच आयोजकांशी पूल पार्टीबाबत ती चॅटिंगच्या माध्यमातून संपर्कात होती.

अखेर फोन उचलत नसल्यानं एंजीच्या कुटुंबीयांना आयोजकांनी विचारलं. तिची चौकशी केली. तेव्हा कळलं की ती घरातल्यांपासून वेगळी राहतेय. पण त्या दरम्यानच्या काळात घराची बिलं, फोनची बिलं ऑनलाईन पद्धतीने भरली जात होती, हेही तपासातून समोर आलं. संशय बळावला. पोलिसांनी अखेर तपासाची चक्र फिरवली.

19 मार्च 2022 रोजी पोलिसांना एक संशयास्प्द बॅग आढळली. उघडून पाहिलं तर त्यात शरीराचे तुकडे होते. ते दृश्य पाहून सगळेच हादरले. शरीराचे तुकडे कुणाचे इथपासून ते नेमकं घडलं काय, या सगळ्याचं गूढ वाढलं. पोलिसांनी तपास सुरु केला.

पण मागच्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या चॅटिंगनेच या हत्याकांडाचा खुलासा केला. पोलिसांनी एंजीसोबत राहणाऱ्या डेविड फोंटाना या 43 वर्षांच्या इसमाला ताब्यात घेतलं. डेविडचं एंजीचे पॉर्न व्हिडीओ शूट करायचा आणि अपलोड करायचा. एंजीसोबत केलेलं क्रूर कृत्य डेविडचंच होतं, हेही पोलिसांच्या तपासातून समोर आलं. डेविडने जे केलं, ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं.

तो दिवस होता 12 जानेवारी 2022. रात्री एंजी आणि डेविड एका रुमध्ये होते. एक पोल डान्स शूट करायचं ठरलं होतं. डेविडने एंजीचे हात बांधले. त्यानंतर तिच्या डोक्यावर एक काळी पॉलिथीनची पिशवी टाकली. यानंतर डेविडने धक्कादायक कृत्य केलं. एंजीच्या डोक्यात हातोडीने प्रहार करुन डेविडने तिची हत्या केली. यानंतर मृत झाले्लया एंजीच्या शरीरासोबत डेविडने संबंध ठेवल्याचीही घृणास्पद बाब समोर आलीय.

एवढ्यावरच डेविड थांबला नाही. पुढे त्याने एंजीच्या शरीराचे बारीक बारीक तुकडे केले आणि ते एका बॅगमध्ये भरुन ठेवले. मृतदेहाचा तो चेहरा एंजीचा आहे, हे कुणाला कळू नये यासाठी त्याने तिचा चेहराच जाळून टाकला. एकूण 27 तुकडे एंजीच्या शरीराचे करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस तिच्या शरीराचे तुकडे फ्रीजरमध्येच ठेवले होते.

अखेर महिन्याभराने त्याने ते तुकडे एका बॅगमध्ये भरुन फेकून दिले होते. पण दरम्यानच्या काळात एंजीचा फोन डेविडच्या हाती लागला होता. कुणालाही तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून डेविडने एंजीचा फोन घेतला. त्यावरुन तो एंजी जिवंत असल्याचं भासवून चॅटिंग करत होता. त्याने पूल पार्टीच्या आयोजकांशीही चॅट केलं होतं. पण आयोजकांचा फोन आल्यानंतर डेविडचा सगळा भांडाफोड झाला.